आता विना INTERNET पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या

आता तुम्हाला विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे. 

Updated: Jun 30, 2022, 03:10 PM IST
आता विना INTERNET पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या  title=

मुंबई : बॅंकमध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन करण्यापेक्षा आजकाल डिजिटल पेमेंटला ऊत आलाय. जो तो स्कॅन कोड स्कॅन करून युपीआयद्वारे मोबाईल फोनद्वारे पे करतोय. मात्र कधी-कधी हे पेमेंट करण्यास अडथळा येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऑफलाईन पेमेंट कसे करावे याची पद्धत सांगणार आहोत.  

Google Pay, Paytm, PhonePe यांसारख्या अॅप्सवरून पैसे पाठवताना इंटरनेट काम करत नाही. अशा परिस्थितीत UPI आधारित डिजिटल पेमेंट शक्य नाही. पण, तुम्ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला USSD कोडची मदत घ्यावी लागेल. या सेवेद्वारे, तुमच्या फोनमध्ये इंटरनेट किंवा मोबाइल डेटा काम करत नसला तरी तुम्ही पेमेंट करू शकता. मात्र, यासाठी मोबाईलमध्ये नेटवर्क असणे आवश्यक आहे. म्हणजेच, जर तुम्ही कॉल करू शकत असाल, तर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

तुम्हाला मोबाईलवर *99# डायल करावे लागेल. ही USSD सेवा वापरून, तुम्ही UPI मधून पैसे ट्रान्सफर करू शकता. म्हणजेच या सेवेमध्ये इंटरनेट नसेल तरी आपत्कालीन परिस्थितीत पेमेंट करता येणार आहे.  

असे करा ऑफलाईन पेमेंट 

  • तुम्हाला तुमच्या फोनच्या Dial पॅडवर जावे लागेल. 
  • Dial पॅडवर गेल्यानंतर, तुम्हाला *99# टाइप करून CALL बटणाला स्पर्श करावा लागेल. 
  • यानंतर तुमच्या समोर एक पॉप-अप MENU येईल.
  • यामध्ये तुम्हाला अनेक OPTION मिळतील. 
  • यापैकी तुम्हाला SEND MONEY हा पर्याय म्हणजेच 1 नंबर पाठवावा लागेल. 
  •  तुम्हाला मोबाईल नंबर, UPI आयडी, बँक खाते तपशील यांसारखे पैसे पाठवण्याचे अनेक पर्याय मिळतील. 
  • तुम्हाला ज्या माध्यमातून पैसे पाठवायचे आहेत ते माध्यम निवडा.
  • तपशील भरा आणि तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम भरा.
  • तुम्ही UPI पिन देऊन हस्तांतरण पूर्ण करू शकता. 
  • विशेष म्हणजे ही सेवा वापरण्यासाठी, तुमचा नंबर UPI वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

 दरम्याना या ऑफलाईन पद्धतीने आता तुम्हाला विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे.