iPhoneमध्ये मिळणारे हे जबरदस्त फिचर आता Whatsapp मध्ये; अँड्रोइंड युजर्सना होणार फायदा

How to pin message in WhatsApp: अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमुळं मेसेज पिन करता येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 13, 2023, 12:21 PM IST
iPhoneमध्ये मिळणारे हे जबरदस्त फिचर आता Whatsapp मध्ये; अँड्रोइंड युजर्सना होणार फायदा title=
WhatsApp Now Lets You Pin Message In Groups And Chats Here Is How

How to pin message in WhatsApp: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर एक नवीन फिचर अॅड करण्यात आले आहे. आत्तापर्यंत फक्त IOS मध्ये असलेले हे फिचर्स आता अँड्रोइडमध्येही उपलब्ध होणार आहे. या फिचरमुळं तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मेसेज पिन करु शकणार आहात. पिन फिचरच्या मदतीमुळं तुमच्या महत्त्वाच्या कामाची माहिती तुमच्या डोळ्यासमोरच राहिलं. जेव्हा पण तुम्ही कधी एखादा मेसेज पिन कराल तेव्हा चॅट विंडोमध्ये टॉपवर तुम्हाला हा मेसेज दिसेल. 

कंपनीने आणलेले हे नवीन फिचर तुम्हाला अँड्रोइड आणि IOS युजर्सना चॅट आणि ग्रुप्सचे मेसेज पिन करण्याची सुविधा देते. जेव्हा तुम्हा एखादा मेसेज पिन करता तेव्हा ते चॅट विंडोमध्ये टॉपवर दिसेल. या फिचरचा तुम्हाला तेव्हा फायदा होईल जेव्हा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करायला जाणार असाल आणि त्याची वेळ आणि लोकेशन तुम्हाला लक्षात राहात नसेल तर तो मेसेज तुम्ही व्हॉट्सअॅपवर पिन करुन ठेवू शकता. पिन फिचरच्या मदतीने तुम्हाला त्याची माहिती लगेचच चॅटमध्ये मिळेल आणि तुम्हाला मेसेज सर्च करण्याची गरज पडणार नाही. 

कंपनी लवकरच एकापेक्षा जास्त मेसेज पिन करण्याची सुविधा देणार आहे. सध्या हे फिचर अँड्रोइड बीटा टेस्टरकडे उपलब्ध आहे. मेसेज पिन करण्यासाठी सर्वप्रथम त्या मॅसेजवर जास्तवेळ प्रेस करुन ठेवा. त्यानंतर तुम्हाला मेसेज पिन करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मेसेज टॉपवर येईल. तुम्ही टेक्स्टमेसेज बरोबरच फोटोदेखील पिन करु शकता. IOS मध्ये मेसेज पिन करण्यासाठी तुम्हाला फक्त उजव्या बाजूला स्वाइप करायचे आहे. 

वेळ सेट करु शकता 

पिन केलेला मेसेज तुम्ही किती वेळ ठेवू शकता हे देखील तुम्ही ठरवू शकता कंपनी तुम्हाला 24 तास, 7 तास आणि एक महिन्याचा पर्याय देते. यातील कोणताही एक पर्याय तुम्ही वापरु शकता. तसंच, तर तुम्हाला कोणताही मेसेज अनपिन करायचा असेल तर त्यासाठी आधीसारखीच प्रक्रिया फॉलो करावी लागणार आहे. यावेळी पिनच्या ऐवजी तुम्हाला अनपिनचा पर्याय मिळणार आहे. 

दरम्यान, ग्रुपवरील एखादा मेसेज अनपिन करण्यासाठी तुम्हाला तेव्हाच परवानगी मिळेल जेव्हा ग्रुप अॅडमिन तुम्हाला यासाठी परवानगी देईल. भारतात लवकरच हे फिचर येणार आहे. सध्या एकएक टप्प्यात हे फिचर लाँच करण्यात येत आहे.