Xiaomi चा 'हा' 15 मिनिटांमध्ये फुल चार्ज होणार स्मार्टफोन मिळतोय केवळ 2 हजारांत; जाणून घ्या सविस्तर

Flipkart वर Electronic Sale सुरु आहे. Xiaomi ने मागील वर्षी 15 मिनिटांमध्ये फुल चार्ज होणारा स्मार्टफोन लॉन्च केला होता. हाच फोन केवळ 2000 हजार रुपयांची संधी या सेलदरम्यान उपलब्ध आहे. जाणून घेऊयात हा फोन कशाप्रकारे अवघ्या 2 हजारांमध्ये विकत घेता येईल

Updated: Jan 27, 2023, 05:38 PM IST
Xiaomi चा 'हा' 15 मिनिटांमध्ये फुल चार्ज होणार स्मार्टफोन मिळतोय केवळ 2 हजारांत; जाणून घ्या सविस्तर title=
xiaomi 11i hypercharge 5g

Flipkart Electronic Sale: फ्लिपकार्ट (Flipkart) वर सध्या इलेक्ट्रॉनिक सेल (Electronic Sale) सुरु आहे. हा सेल 24 जानेवारीपासून सुरु झाला असून तो 31 जानेवारीपर्यंत असेल. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात आली आहे. तुम्ही सुद्धा जुना स्मार्टफोन वापरत असाल आणि नवीन फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा सेल एक सुवर्ण संधी आहे असं म्हणता येईल. या सेलमध्ये अनेक महागडे फोन अगदी स्वस्तात उपलब्ध आहेत. Xiaomi च्या एका खास फोनचाही या स्वस्तात मिळणाऱ्या फोन्समध्ये समावेश आहे. हा फोन अवघ्या 2000 रुपयांना विकत घेण्याची संधी या सेलमध्ये आहे. कशाप्रकारे अवघ्या दोन हाजारांमध्ये हा फोन विकत घेता येईल पाहूयात...

मूळ किंमत किती? (Xiaomi 11i Hypercharge 5G)

ज्या फोनबद्दल आपण बोलत आहोत त्याचं नाव आहे शाओमीचा 11i हायपरचार्ज 5G. लॉन्चिंग प्राइज 31 हजार 999 रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा फोन केवळ 24 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर 7000 हजरांची सूट देण्यात आली आहे. तसेच बँकांकडून आणि एक्सचेंज ऑफरमध्येही या फोनवर वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे फोन अधिक कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो.

बँकांकडून विशेष ऑफर (Xiaomi 11i Hypercharge 5G Bank Offer)

जुना फोन एक्सचेंज करायचा नसला तरी या फोनची किंमत थोडी कमी करुन तुम्हाला ऑफरचा फायदा घेता येईल. बँकांच्या वेगवेगळ्या ऑफर्स या फोनवर आहेत. फोन विकत घेण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केल्यास 3 हजार रुपयांची सवलत मिळेल. त्याचबरोबर डेबिट कार्ड कोटक बँकेचं असेल तर 750 रुपयांचा इन्सटंट डिस्काऊंट मिळेल. ही सवलत घेतल्यास फोन 21 हजार 250 रुपयांना विकत घेता येईल.  

एक्सचेंजमध्ये घसघशीत सूट (Xiaomi 11i Hypercharge 5G Exchange Offer)

आता एक्सचेंज ऑफर्सबद्दल बोलायचं झाल्यास या फोनवर तब्बल 30 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन हा फोन एक्सचेंजअंतर्गत विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुम्ही वापरु शकता. मात्र 23 हजारांचा संपूर्ण डिस्काउंट मिळण्यासाठी एक्सचेंजमध्ये जो स्मार्टफोन दिला जातोय तो चांगल्या कंडीशनमध्ये आणि लेटेस्ट मॉडेलचा असावा. जर संपूर्ण ऑफर लागू झाली असा तुमचा फोन असेल तर केवळ दोन हजारांमध्ये हा फोन विकत घेता येईल.