जया बच्चन यांच्या माहेरी कोण-कोण आहेत माहितीये का?

जया यांचा जन्म

जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 मध्ये बंगाली कुटुंबात झाला, तर त्यांचं नाव जया भादुरी होतं. लग्नानंतर त्यांनी बच्चन हे आडनाव लावलं.

आई-वडील

जया यांचे वडील तरुण भादुरी हे लेखक, पत्रकार आणि स्टेज आर्टिस्ट होते. तर त्यांच्या आईचं नाव इंदिरा भादुरी होतं.

जया यांचं शालेय शिक्षण

जया यांनी भोपाळमध्ये शालेय शिक्षण केलं. तर 1966 मध्ये NCC राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाला आहे.

अभिनयाचे धडे

जया यांनी फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया पुणेमध्ये अभिनयाचे धडे घेतले. त्यावेळी त्यांना गोल्ड मेडल देखील मिळालं.

किती भाऊ-बहिणी?

जया बच्चन यांना दोन बहिणी आहेत. जया सगळ्यात मोठ्या आहेत. तर नीता आणि रीता अशी त्यांच्या बहिणींची नावं आहेत.

वयाच्या 15 वर्षी केलं काम

जया यांनी 15 वर्षांच्या असताना अभिनय क्षेत्रात बंगाली चित्रपट 'महानगर' मधून पदार्पण केलं.

भावोजी अभिनेता

जया यांची बहीण रीता भादुडी या लाइमलाईटपासून लांब असल्या तरी त्यांचे पती राजीव वर्मा हे अभिनेता आहेत. त्या दोघांनी पळून लग्न केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story