सारा अली खान करणार लग्न, नवरदेव कोण? करण जोहर म्हणाला, 'एक मुलगा...'

सर्वात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक

28 वर्षीय सारा अली खान ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

आगामी चित्रपटामुळे चर्चेत

सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'ऐ मेरे वतन' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

मोशन पोस्टर

गोव्यामध्ये आयोजित आयएफएफआय 2023 च्या सोहळ्यामध्ये करण जोहरने साराच्या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज केलं.

एक चांगला वर शोधण्याचं मिशन

या कार्यक्रमामध्येच बोलताना करण जोहरने आपलं पुढलं मिशन सारा अली खानसाठी एक चांगला मुलगा शोधण्याचं आहे असंही सांगितलं.

लोकांचं जुळवून देण्याची फार हौस

माझ्यामध्ये लग्न जुळवून देणारी मॅचमेकर सीमा तपारिया लपलेली आहे. मी त्या पंजाबी काकुंसारखा आहे ज्यांना लोकांचं जुळवून देण्याची फार हौस असते, असं करण जोहरने मस्करीत म्हटलं.

अशा गप्पा माझ्या शोमध्येच

सारा अली खानचं लग्न लावून देणं हे माझं पुढलं मिशन आहे असंही करण जोहर म्हणाला. अशाप्रकारच्या गोष्टींबद्दलच्या गप्पा मला माझ्या शोमध्येच करता येतात, असं करण जोहरने सारा अली खानकडे पाहत म्हटलं.

हे खरं नाही का?

'ज्या लोकांनी माझ्या शोमध्ये येऊन जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण झाली,' असं करण जोहर म्हणाला. त्याने हे खरं नाही का? असं साराला विचारलं असता ती मोठ्याने हसू लागली.

लग्नासंदर्भात भाष्य केलेलं

मागील वर्षी सारा अली खानने कॉफी विथ करणमध्ये लग्नासंदर्भात भाष्य केलं होतं.

इंटीमेट पद्धतीने...

मला रणबीर आणि आलियाप्रमाणे फार इंटीमेट पद्धतीने लग्न करण्याची इच्छा आहे, असं सारा म्हणालेली.

कार्तिक आर्यनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती

साराच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर सारा अली खानने कार्तिक आर्यनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.

नातं फार टिकलं नाही

मात्र सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचं नातं फार काळ टिकलं नाही.

सारा शोधतेय जोडीदार

सारा अजूनही तिच्या स्वप्नांच्या राजकुमाराच्या शोधात आहे.

कधी मिळणार स्वप्नातला राजकुमार?

आता तिला खरोखर करण हा स्वप्नातला राजकुमार शोधून देतो का हे येणारा काळच सांगेल.

VIEW ALL

Read Next Story