छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखलं जातं.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. यामध्ये त्याने साकारलेली राणादा ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

आता हार्दिक जोशीने त्याच्या वडिलांना एक नवीन कार भेट म्हणून दिली आहे.

त्याचे काही फोटो हार्दिकने नुकतंच शेअर केले आहे. या त्याचे वडील, आई, भाऊ, अक्षया हे सर्वजण दिसत आहे.

"खास वाढदिवसाचे गिफ्ट खास माणसासाठी. वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा", असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.

हार्दिकने त्याच्या वडिलांसाठी महिंद्रा कंपनीची XUV700 ही गाडी खरेदी केली आहे.

या गाडीची किंमत 25 ते 26 लाखांपर्यंत आहे. हार्दिकच्या या फोटोवर अनेक चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

सध्या हार्दिक ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकत आहे. याआधी तो ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका निभावत आहे.

VIEW ALL

Read Next Story