मराठी मालिका तसेच नाट्यविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जाते.

'नांदा सौख्य भरे', 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळुबाई' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत प्राजक्ताने साकारलेली येसूबाईंची भूमिका चांगलीच गाजली होती.

आता प्राजक्ताने उज्जैनचे महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.

याचे काही फोटो प्राजक्ता गायकवाडने शेअर केले आहेत.

यावेळी प्राजक्ता हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करुन शिप्रा नदीच्या काठावर बसल्याचे दिसत आहे.

"शिव ही सत्य हैं, शिव अनंत हैं, शिव अनादि हैं, शिव भगवंत हैं, शिव ओंकार हैं, शिव ब्रह्म हैं, शिव शक्ति हैं, शिव भक्ति हैं", असे कॅप्शन प्राजक्ताने या पोस्टला दिले आहे.

प्राजक्ताच्या या फोटोवर अनेकांनी 'हर हर महादेव', 'खूप छान' अशा कमेंट पाहायला मिळत आहेत.

VIEW ALL

Read Next Story