छोट्या पडद्यावरील 'देवयानी' या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सुर्वे ही घराघरात पोहोचली.

यानंतर ती 'ट्रीपल सीट', 'वाळवी', 'सातरचा सलमान', 'झिम्मा 2' यांसारख्या चित्रपटात झळकली.

गेल्या कित्येक वर्षांपासून शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरेला एकमेकांना डेट करत होते.

काही दिवसांपूर्वी शिवानी आणि अजिंक्यने थाटामाटात लग्नगाठ बांधली.

आता सध्या शिवानी सुर्वे ही पती अजिंक्य ननावरेसोबत पुद्दुचेरीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

याचे काही खास फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

यावेळी शिवानीने या शहराचा सांस्कृतिक वारसा, खाद्य संस्कृती याची झलकही दाखवली आहे.

विशेष म्हणजे शिवानी आणि अजिंक्यचा पुद्दुचेरीमध्ये खास रोमँटिक अंदाजही पाहायला मिळत आहे.

त्या दोघांच्या या फोटोवर अनेक कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

VIEW ALL

Read Next Story