‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणून कार्तिकी गायकवाडला ओळखले जाते. कार्तिकीने तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.

आता कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे.

कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

तिने तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यावेळी कार्तिकीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. त्यासोबतच तिने हलव्याचे दागिने परिधान केले होते.

"ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण" असे कॅप्शन कार्तिकी गायकवाडने या फोटोंना दिले आहे.

दरम्यान कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांनी 2020 मध्ये लग्नगाठ बांधली.

रोनित पिसे हा व्यावसायिक आहे. तो पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे.

VIEW ALL

Read Next Story