कुठे आहे सोनू सूदचे घर?

सोनू सूदकडे मुंबईत आलिशान 2,600-चौरस फूटांचे चार बेडरूमचे हॉलचे जबरदस्त असं घर आहे. सोनू सूदचे हे घर अंधेरी लोखंडवाला परिसरात यमुना नगर येथे आहे.

राहण्यासाठी निवडली अंधेरीतील जागा

माझं करिअर सुरू होण्याआधीच अंधेरीत अनेक वर्षांपासून राहत आहे. माझे सर्व मित्र जवळ आहेत. माझ्या मुलांची शाळा, चांगली रेस्टॉरंट्स, विविध शॉपिंग मॉल्स आणि मल्टिप्लेक्स हे सर्व जवळपास आहेत, असे सूद सांगतो.

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार घराची रचना

सोनूच्या आलिशान घराची किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीची रचना वास्तुशास्त्रासह केली आहे. झुबिन झैनुद्दीन आणि कृपा झुबिन यांच्या मदतीने सोनू सूदने त्याच्या घराची रचना केली आहे. (फोटो - housing.com)

दरवाजावर आकर्षक आकृती

सोनू सूदच्या घराच्या प्रवेशद्वारावर एक कलात्मकरित्या तयार केलेला मुख्य दरवाजा आहे. ज्यावर एक धातूची एक आकृती आहे, ज्याची रचना सूद याने स्वतः केली आहे. (फोटो - housing.com)

घरामध्येच जीम

सोनू हा फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळेच त्यांच्या घरात जिमही बांधली आहे. जिथे तो अनेक तास वर्कआउट करतो.

आकर्षक लिव्हिंग रूम

लिव्हिंग रूममध्ये इटालियन ट्रॅव्हर्टाइन फ्लोअरिंग आहे, तर भिंती सिल्क वॉलपेपर आणि टेक्सचर इफेक्टने सुशोभित केलेल्या आहेत, ज्यामुळे घराला एक आकर्षक लूक येतो. (फोटो - housing.com)

मंदिरामुळे वाढली घराची शोभा

किचनच्या जवळ असलेले मंदिर शांत वातावरणात भर घालते. मंदिराच्या कोरियन दगडावर ओम कोरलेले आहे. (फोटो - housing.com)

फुटबॉलप्रेमी सोनू सूद

सोनू सूद आणि त्याच्या मुलांना फुटबॉल हा खेळ आवडतो. त्यामुळे त्यांच्या खोलीतील वॉर्डरोबच्या शटरवर पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोची एक मोठी प्रिंट आहे, त्यावर ‘आयम फॉर युवर गोल्स’ असे लिहिलेले आहे. (फोटो - housing.com)

मदतीसाठी घर ठेवलं होतं गहाण

सूदने त्याच्या मानवतावादी मोहिमेसाठी आणि मदत कार्यासाठी निधी उभारण्यासाठी पॉश जुहू परिसरातील सहा अपार्टमेंट आणि दोन दुकाने गहाण ठेवली होती.

हैदराबादमध्येही आहे घर

सोनू सूदचे हैदराबादमधील प्रीमियम बंजारा हिल्स परिसरात एक आलिशान घर आहे कारण तो अनेकदा त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी शहरात येत असतो.

VIEW ALL

Read Next Story