संजय लीला भन्साळी यांची हिरामंडीची सर्वांना उत्सुकता आहे. हिरामंडीमध्ये सर्वाधिक मानधन कोणी घेतलं हे समोर आलंय.

सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, मनिषा कोईराल, संजिदा शेख, शर्मिन सहगल, रिचा चड्ढा आणि फरदीन खान हे ओटीटीवर झळकणार आहेत.

या सीरिजमध्ये काम करण्यासाठी सर्वात कमी मानधन 35 लाख अभिनेत्री शर्मिन सहगलला देण्यात आलंय.

त्यानंतर संजिदा शेख हिला 40 लाख मानधन देण्यात आलंय.

अनेक वर्षांनंतर फरदीन खान यात दिसणार असून त्याला 75 लाखांवर समाधान मानावे लागलेय.

रिचा चड्ढा हिला 1 कोटी मानधन मिळालं आहे.

मनिषा कोईराला हिलादेखील 1 कोटी मानधन देण्यात आलंय.

अदिती राव हैदरीला या सीरिजसाठी 1.5 कोटी मानधन मिळाले आहेत.

तर सर्वाधिक मानधन सोनाक्षी सिन्हाला दिलं गेलंय. तिला हिरामंडी या सीरिजसाठी तब्बल 2 कोटी रुपये देण्यात आलंय.

VIEW ALL

Read Next Story