कर्तृत्त्व

Business News : हे नाव कोणाचं माहितीयं? या महिलेच्या कर्तृत्त्वाला तुम्हीही कराल सलाम.

गुंतवणूक

20 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या या महिलेचं नाव आहे रजनी बेक्टर. प्रचंड जिद्द आणि समर्पकतेतून त्यांनी हा व्यवसाय उभा केला.

आईस्क्रीमचा व्यवसाय

व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणी आणि सामाजिक बंधनांचा सामना करावा लागला होता. त्यांनी लुधियानातील घरातूनच आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु केला होता.

रजनी बेक्टर

पुढे रजनी बेक्टर यांनी बिस्कीट आणि इतर खाद्यपदार्थांच्या निर्मितीस सुरुवात केली. अतिशय कमी वेळात रजनी बेक्टर यांची उत्पादनं लोकप्रिय झाली आणि भारतात त्यांना 'आईस्क्रीम लेडी' ही ओळख मिळाली.

प्रसिद्धी

बेक्टर इतक्या प्रसिद्ध झाल्या, की मेकडॉनल्ड्सनं बेक्टर्स फूड स्पेशलिटीज लिमीटेडला परमनंट सप्लायर म्हणून निवडलं. ही रजनी बेक्टर यांच्यासाठी एक मोठी संधी होती.

उत्पादनांची वाढती मागणी

पुढे उत्पादनांची वाढती मागणी पाहता रजनी बेक्टर यांनी व्यवसासाची व्याप्ती वाढवली. 2023 पर्यंत त्यांच्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 6681 कोटी रुपयांवर पोहोचली होती.

1940 मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे जन्मलेल्या रजनी यांचं कुटुंब 1947 च्या फाळणीनंतर दिल्लीत आलं. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचं लग्न लुधियानाकील धर्मवीर बेक्टर यांच्याशी झालं.

उल्लेखनीय उंची

अतिशय मेहनतीच्या बळावर त्यांनी उद्योग जगतामध्ये उल्लेखनीय उंची गाठली. ज्यामुळं रजनी बेक्टर हे नाव भारतीय उद्योग जगतामध्ये अतिशय आदरानं घेतलं जातं.

VIEW ALL

Read Next Story