काळे प्लास्टिक बॉक्समधले अन्न आरोग्यासाठी घातक, होऊ शकतो कर्करोग!

काळ्या प्लास्टिक बॉक्स चा वापर

काळ्या प्लास्टिकचे आवरण असलेली भांडी सध्या अनेक जण स्वयंपाक करत किंवा बॉक्समधलं खातात.

आरोग्यावर विनाशाकारी परिणाम

उष्णतेपासून संरक्षण देणारी ही भांडी असली तरी आरोग्यासाठी ती अपायकारक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. या भांड्यांच्या वापरामुळे आरोग्यावर संभाव्य विनाशाकारी परिणाम होऊ शकतात.

प्लास्टिक भांडे

बहुतेक स्वयंपाकघरात काळ्या प्लास्टिकपासून बनवलेला स्पॅटुला वापरला जातो. बोथट, रुंद चमच्यासारखे असणारे हे भांडे असते.

विषारी द्रव्ये

मात्र काळ्या प्लास्टिकच्या स्पॅटुलामध्ये कार्बन असतो, ज्यामध्ये विषारी पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच) असतात.

हे विषारी घटक स्वयंपाक करताना अन्नात शिरू शकतात. त्यामुळे श्वसनाच्या समस्या, अवयवांचे नुकसान आणि कर्करोग होण्याची शक्यता असते, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली.

आहारतज्ज्ञ व मधुमेहतज्ज्ञांनी सांगितले की, काळी प्लास्टिकची भांडी स्वयंपाक करताना पीएएचमुळे चिंता वाढवतात.

काळ्या प्लास्टिकच्या भांड्यांमधून अन्नामध्ये पीएएच उतरते. विशेषत: अधिक उष्णतेमध्ये अन्न शिजवताना ही प्रक्रिया होते. त्यामुळे अन्नपदार्थ आरोग्यास अपायकारक बनतात.

VIEW ALL

Read Next Story