एक आंबा 12 हजार रुपयाला; जगातील सर्वात महागडा आंबा

सिंधरी आंबा

पाकिस्तानच्या सिंध भागात येणारा हा आंबा खूप गोड असतो. तर तो इतर आंब्यांच्या तुलनेत आकारानं थोडा मोठा असतो.

किती आहे किंमत?

फक्त पाकिस्तानमध्ये नाही तर भारतात ही आवडीनं खाल्ला जातो. हा एक आंबा 3 हजार रुपयाला मिळतो.

कोहीतुर आंबा

कोहीतुर आंब्याची साल ही खूप पातळ असते. A CondeNast Traveller यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंब्याची निर्मिती ही 18 व्या शतकात नवाब सिराज उद-दौलाह यांनी केली होती.

किती आहे किंमत?

पश्चिम बंगालमध्ये या आंब्याची शेती करण्यात येते, तर याच्या एका आंबाची किंमत ही 3000 ते 12000 रुपये आहे.

नूरजहान आंबे

अफगाणिस्तानमधून भारतात आलेला हा आंबा खूप चविष्ट आहे. या आंब्याला मुघलांच्या राणीचं नाव मिळालं आहे.

किंमत आणि वजन?

नूरजहानचा एक आंबा हा कमीतकमी 3.5 किलोच्या आसपास असतो, तर या आंब्याची किंमत 1000 रुपयांपासून सुरु होते.

मियाझकी आंबा

मियाझकी आंबा हा जपानमध्ये येतो. हा आंबा जगातला सगळ्यात महाग आंबा आहे. जर तुम्हाला एक किलो आंबा घ्यायचा असेल तर तुम्हाला तब्बल 3 लाख रुपये मोजावे लागतील.

VIEW ALL

Read Next Story