एकदा माठात पाणी भरल्यानंतर ते किती दिवस वापरावं?

पाणी थंड राहतं

मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी थंड राहतं.

मातीच्या भांड्यातून पाणी पिण्यास प्राधान्य

खास करुन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मातीच्या भांड्यातील पाणी पिण्यास प्राधान्य दिलं जातं.

अनेकजण उन्हाळ्यात माठातलं पाणी पितात. उन्हाळ्यात माठातून पाणी पिण्याऱ्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतं.

तुम्हाला ठाऊक आहे का?

मात्र तुम्हीही उन्हाळ्यात माठातलं पाणी पीत असाल तर एकदा साठवलेलं पाणी किती दिवस पिणं योग्य असतं तुम्हाला ठाऊक आहे का?

पाणी किती दिवस पिण्यायोग्य?

माठात साठवलेलं पाणी किती दिवस पिण्यायोग्य असतं हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...

माठ किती फ्रिक्वेंटली धुतला पाहिजे?

माठात पाणी साठवत असाल तर किमान दर दोन दिवसांनी माठ धुतला पाहिजे. माठ नियमितपणे स्वच्छ धूणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं.

पाणी बदललं नाही तर...

माठातलं पाणी बराच काळ बदललं नाही तर त्यात जीवजंतू निर्माण होण्याची शक्यता असते.

माठावर झाकण ठेवत असाल तरी..

तुम्ही माठावर झाकण ठेवत असाल तरी त्यामधील पाणी नियमितपणे पूर्णपणे बदललं पाहिजे.

नीट विसळावा माठ

माठ धुताना नेहमी त्याच्या आतील बाजूने हात फिरवला पाहिजे. माठ धुताना नीट विसळला पाहिजे.

किती वेळ ठेवावं पाणी?

माठात एकदा पाणी भरल्यानंतर ते जास्तीत जास्त 24 तास ठेवावं असं सांगितलं जातं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story