मुंबईला टक्कर देताहेत नवी मुंबईतील 'हे' 7 परिसर; इथं घर खरेदीचा विचारही महाग

पनवेल

पनवेलमध्ये 2024 च्या सुरुवातीपासूनच घर खरेदीसाठी अनेकांनी निर्णय घेतला असून, इथं प्रति चौरस फुटांचा दर आहे 7300 रुपये.

खारघर

महाविद्यालयांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खारघरमध्ये प्रति चौरस फुटांसाठी 9300 रुपये मोजावे लागत आहेत.

कामोठे

पनवेल हायवेला लागून असणाऱ्या कामोठे येथे प्रति चौरस फुटांचा दर आहे 7800 रुपये.

वाशी

अनेक दृष्टींनी महत्त्वाच्या असणाऱ्या वाशी परिसरामध्ये प्रति चौरस फुटांचा दर आहे 13100 रुपये.

तळोजा

खारघर नोडचा विस्तार असणाऱ्या तळोजामध्ये प्रति चौरस फुटांसाठी 6200 रुपये मोजावे लागतात.

ऐरोली

ऐरोलीमध्येही घरं आणि भूखंडांची मागणी वाढली असून इथं प्रति चौरस फुटांचा दर आहे 12400 रुपये.

बेलापूर

आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलापूरमध्ये प्रति चौरस फुटांचा दर आहे 12500 रुपये.

VIEW ALL

Read Next Story