अक्षय्य तृतीयेला चुकूनही करु नका 'या' चुका; लक्ष्मी होईल नाराज

साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असतो. शुक्रवारी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी कऱणं शुभ मानलं जातं. त्यात सोनं खरेदी करणं फारच चांगलं मानलं जातं.

पण ज्योतिषांच्या मते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही चुका करणं टाळलं पाहिजे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी कऱणं शुभ मानलं जातं, मात्र या दिवशी प्लास्टिक, अॅल्यूमिनिअम, स्टीलची भांडी आणि सामान खरेदी करु नये.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुगार, खोटं बोलणं अशा चुका करु नका.

या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. यामुळे लक्ष्मी नाराज होते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कांदा, लसूण, मांस यांचं सेवन करु नये.

अक्षय्य तृतीयेला पूजेचं, तिजोरीचं ठिकाण स्वच्छ ठेवा. जागा स्वच्छ नसल्यास लक्ष्मी नाराज होते.

अक्षय्य तृतीयेला काळे कपडे परिधान करु नका.

VIEW ALL

Read Next Story