वुमन्स प्रीमिअर लीग 2024 सुरुवात झालीय. या स्पर्धेचा रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडला. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोहळ्यात हजेरी लावली होती.

या सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते शाहरुख खानने. शाहरुखने 'झुमे जो पठाण' आणि 'रवैया वस्ता वंया' या गाण्यावर डान्स केला .

ब्लॅक पँट आणि शर्ट, गोल्डन बेल्ट आणि शर्टवर डिझाईन बटन्स असा ड्रेस शाहरुखने परिधान केला होता.

किंग खानचा परफॉर्मन्स पाहून स्टेडिअममधला प्रत्येक जण त्याच्या गाण्यावर थिरकला. शाहरुखच्या डान्सने कार्यक्रमांची रंगत वाढवली.

याशिवाय शाहरुखने उद्घाटन सोहळ्यात शानदार भाषणही केलं. इतकंच नाही तर प्रेक्षकांच्या विनंतीला मान देत त्याने आपली सिग्नेचर स्टेपही केली.

उद्घाटन सोहळ्यीच सुरुवात कार्तिक आर्यनच्या डान्सने झाली. भूल भुलैय्या 2 च्या गाण्यावर त्याने शानदार परफॉर्मन्स केला.

याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि शाहिद कपूरनेही परफॉर्म करत उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवली. शाहिदने मोटरबाईकवरुन मैदानात एन्ट्री घेतली.

VIEW ALL

Read Next Story