टीम इंडिया पाकिस्तानामध्ये खेळायला जावंच लागणार? PCB ने बनवला मास्टर प्लॅन

2008 नंतर भारत पाकिस्तानात गेला नाही

भारतीय संघ 2008 नंतर कधीच पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला नाही. बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याच्या विरोधात आहे.

राजकीय संबंध ताणले गेले

2008 साली भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये गेला होता. त्यानंतर राजकीय संबंध ताणले गेल्याने भारताने पाकिस्तानमध्ये संघाला न पाठवण्याची भूमिका घेतली आहे.

16 वर्षांमध्ये दौरा नाही

राजकीय संबंध कमालीचे ताणले गेल्याने बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवत नाही. मागील 16 वर्षांमध्ये भारताने एकही पाकिस्तान दौरा केलेला नाही.

भारताला पाकिस्तानमध्ये खेळवण्याची तयारी

मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये खेवण्यासाठी एक योजना तयार केली असून ती अंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे पाठवली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये

पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार आहे.

पीसीबीने आयसीसीला पाठवला प्लॅन

याच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघाचं वेळापत्रक कसं ठेवता येईल आणि भारतीय संघाच्या सुरक्षेसाठी काय करता येईल याची योजना पीसीबीने आयसीसीला पाठवली आहे.

या चार ठिकाणी खेळवले जाणार सामने

कराची, रावळपिंडी, लाहोर या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सामने खेळवले जाणार असले तरी भारतासाठी विशेष नियोजन केलं जाईल.

पीसीबीचा प्लॅन काय?

भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये फारसं फिरावं लागू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने भारताचे सर्व सामने एकाच मैदानात म्हणजेच एकाच शहरात खेळवले जातील असं पीसीबीने म्हटलं आहे.

...तर भारताला जावेच लागेल

आयसीसीने जर याला मंजुरी दिली आणि बीसीसीआयकडे कोणता पर्याय उपलब्ध नसेल तर भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये जावेच लागेल.

भारत सरकार परवानगी देणार का?

मात्र आता भारत सरकार भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी परवानगी देणार का हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

त्रयस्त ठिकाणी खेळवण्यासंदर्भात प्रयत्न

भारताचे सामने त्रयस्त ठिकाणी खेळवण्यासंदर्भात बीसीसीआयच्या हलचाली सुरु असल्याची चर्चाही मागील काही महिन्यांपासून रंगली आहे.

17 वर्षांतील पहिलाच दौरा

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानमध्ये गेला तर तो टीम इंडियाचा 17 वर्षांतील पहिलाच दौरा ठरेल.

VIEW ALL

Read Next Story