आयपीएल 2024 मध्ये 24 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान चुरशीचा सामना खेळला गेला.

दिल्लीने पहिली फलंदाजी कत 224 धावा केल्या. ऋषभ पंतने 44 चेंडूत 88 धावा केल्या. तर अक्षरने 43 चेंडूत 66 धावा केल्या.

गुजरात टायटन्सनेही दिल्लीला कडवी टक्कर दिली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्लीने 4 धावांनी हा सामना जिंकला.

शेवटच्या सामन्यात गुजरातला विजयासाठी 19 धावांची गरज होती. राशिद खानने या षटकात 14 धावा केल्या.

राशिदची फटकेबाजी पाहात गुजरात हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण शेवटच्या चेंडूवर राशिद खानला केवळ एक धाव घेता आली.

त्याआधी अठराव्या षटकात एक अजीब घटना घडली. या षटकात मुकेश कमारने टाकलेला चेंडू क्रिझच्या बाहेर गेला. पण अंपायरने हा वाईड बॉल देण्याऐवजी नो बॉल दिला.

अंपायरच्या या निर्णयवर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पण आयपीएलच्या नियमानुसार चेंडू खेळपट्टीच्याही बाहेर होता आणि अशा परिस्थितीत तो नो बॉल दिला जातो.

VIEW ALL

Read Next Story