आयीएलच्या दहाव्या सामन्यासाठी मैदानात उतरताच कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर सुनील नरीनने इतिहास रचला.

35 वर्षांच्या सुनील नरीनचा टी20 क्रिकेट कारकिर्दीतील हा 500 वा सामना होता. 500 टी20 सामने खेळणारा सुनील नरीन हा चौथा क्रिकेटपटू आहे.

सुनील नरीनच्या आधी कायरन पोलार्ड (660), ड्वे ब्राव्हो (573) आणि शोएब मलिक (542) यांनी टी20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली आहे.

सुनील नरीन आयपीएलशिवाय, वेस्ट इंडिज, अबू धाबी नाईट रायडर्स, केप कोबराज, कोमिला विक्टोरियन्स, ढाका डायनामाइट्स, गयाना अमेजन वॉरियर्स, लाहोर कलंदर्स, मेलबर्न रेनेगेड्स, ओव्हल इनविन्सिबल्स, सरे अशा अनेक संघातून खेळला आहे.

सुनील नरेनने 500 टी20 सामन्यात आतापर्यंत 536 विकेट घेतल्या आहेत. तसंच 3736 धावाही त्याच्या नावावर जमा आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट ड्वेन ब्राव्हो (625) आणि राशिद खान (566) यांच्या नावावर आहेत. यानंतर सुनील नरीन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर सर्वाधिक टी20 सामने रोहित शर्मा खेळलाय. रोहित शर्माने 428 टी20 सामने खेळलेत.

VIEW ALL

Read Next Story