इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चुरशीचे सामने रंगतायत. आतापर्यंत 42 सामने खेळवण्यात आले आहेत.

दर हंगामाप्रमाणे या हंगामातही एक मिस्ट्री गर्ल कॅमेरात कैद झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या मिस्ट्री गर्लची चर्चा रंगलीय.

ही मिस्ट्री गर्ल कोलकाता नाईट रायडर्सची सपोर्टर आहे. केकेआरच्या अनेक सामन्यांवेळी स्टेडिअमध्ये ही उपस्थित असते.

आयपीएलमध्ये केकेआरच्या जवळपास सर्व सामन्यांना मालक शाहरुख खाना आणि मुलगी सुहाना खान उपस्थित असतात.

ही मिस्ट्री गर्लही याचदरम्यान सुहाना खानबरोबर दिसली. ही सुंदर मुलगी कोण आहे याची फॅन्सना मोठी उत्सुकता आहे.

या मिस्ट्री गर्लचं नाव शनाया कपूर आहे. ती अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे.

अनिल कपुरीची भाची शनाया आणि सुहाना खान बेस्ट फ्रेंड आहेत. शनायाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

VIEW ALL

Read Next Story