IPL 2024 : डेव्हिड विलीच नाही तर 'या' इंग्लंडच्या खेळाडूंनी दिलाय 'गोलीगत धोका'

आयपीएलकडे पाठ

आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या खेळाडूंनी आयपीएलकडे पाठ दाखवली आहे.

वर्क लोड मॅनेजमेंट

दुखापतीच्या भीतीपोटी आणि वर्क लोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी आयपीएल फ्रँचायझींकडून खेळण्यास नकार कळवला आहे.

जेसन रॉय

इंग्लंडचा स्टार सलामीवीर फलंदाज जेसन रॉय याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल खेळण्यासाठी नकार दिला होता. रॉयने मागील आयपीएलमध्ये केकेआरकडून दमदार कामगिरी केलीये.

हॅरी ब्रूक

दिल्ली कॅपिटल्सने 4 कोटीला खरेदी केलेल्या हॅरी ब्रुकने आयपीएलला जय महाराष्ट्र केला. त्याच्या आजीचं निधन झाल्याने त्याने क्रिकेटमधून थोडा ब्रेक घेतला आहे.

डेव्हिड विली

लखनऊचा स्टार ऑलराऊंडर डेव्हिड विली खासगी कारणास्तव लखनऊच्या संघात सामील होणार नाही. त्याच्या जागी आता मॅट हेन्रीला संधी मिळाली आहे.

मार्क वुड

मार्क वुड देखील लखनऊ सुपरजायंट्स संघासोबत होता. मात्र, ईसीबीच्या विनंतीवरून वुडने आपलं नाव मागं घेतलं होतं.

गस एटकिंसन

केकेआरने 2 कोटींना खरेदी केलेल्या गस एटकिंसनने देखील ईसीबीच्या सांगण्यावरून आयपीएलला टाटा गुड बाय केला आहे.

VIEW ALL

Read Next Story