'तो' तब्बल 54 वर्ष मॅरेथॉन धावत होता; थक्क करणाऱ्या विक्रमाचा जगावेगळा किस्सा

सर्वात कठीण गोष्ट म्हणजे पूर्ण मॅरेथॉन

मानवी शरीराच्या क्षमतेला आव्हान देणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मॅरेथॉन रेस, असं मानलं जातं.

विशेष तयारी करावी लागते

कोणतीही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच किमान 42 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित धावपटूंनाही विशेष तयारी करावी लागते.

काही तास सतत पळावं लागतं

एखादी साधी मॅरेथॉन धावाची तरी काही तास सतत पळावं लागतं.

मॅरेथॉन पूर्ण करणं हेच यश

त्यामुळे अनेकांना केवळ मॅरेथॉन पूर्ण करणं हे सुद्धा काहीतरी मिळवल्यासारखंच आनंद देणारं असतं.

वेळाशी अनेकदा काही देणंघेणं नसतं

पूर्ण मॅरेथॉन धावण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांना ती पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो याच्याशी काही देणंघेणं नसतं.

55 वर्ष धावत होता मॅरेथॉन

मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी लागलेली सर्वाधिक काळावधी हा 55 वर्षांचा आहे.

हा विक्रम कोणाच्या नावावर?

मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी 55 वर्षांचा वेळ लावण्याचा विक्रम जपानमधील शिंजो कानाकुरी यांच्या नावावर आहे. ते 54 वर्ष 8 महिने, 6 दिवस 5 तास 32 मिनिटं आणि 20.3 सेकंद मॅरेथॉन धावत होते.

कोणला काही कल्पना न देता...

स्वीडनमध्ये स्टॉकहोम्स येथे झालेल्या 1912 च्या मॅरेथॉनमध्ये शिंजो कानाकुरी यांनी कठीण परिस्थितीमुळे शर्यत अर्ध्यात सोडली. अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता शिंजो शर्यतीमधून घरी निघून गेले.

परत दोन वेळा भाग घेतला पण...

शिंजो कानाकुरी यांनी 1916 आणि 1924 च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. मात्र यावेळेस त्यांनी वेगळ्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता.

1966 रोजी विशेष आमंत्रण

1966 साली शिंजो कानाकुरी यांनी शर्यत पूर्ण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. 20 मार्च 1967 रोजी शिंजो कानाकुरी उर्वरित मॅरेथॉन धावले. त्यावेळेस त्यांनी मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी घेतलेला वेळ हा 5 दशकांहून अधिकचा गृहित धरण्यात आला.

वयाच्या 92 व्या वर्षी निधन

शिंजो कानाकुरी यांचं 1983 साली निधन झालं. ते 92 वर्षांचे असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजही मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक वेळ घेण्याचा विक्रम त्यांच्याच नावे आहे.

VIEW ALL

Read Next Story