Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामध्ये अनेक तुल्यबळ लढती पाहायला मिळतील.   

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात जाहीर सभा

Maharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11, तर देशातील 12 राज्यातील 94 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होतेय. महाराष्ट्रातील ज्या 11 मतदारसंघात मतदान होणाराय, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. याठिकाणी पवार, नारायण राणे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

7 May 2024, 21:43 वाजता

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात येत्या शुक्रवारी (ता. 10 मे) सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

7 May 2024, 21:40 वाजता

20 वर्षात खैरेंनी एकही काम केलं नाही आणि आता म्हणतायत इतकी 5 वर्ष मला द्या. म्हणजे वीस वर्षात एकही काम केलं नाही आणि अजून पाच वर्ष वाट लावायची-संदिपान भुमरे

7 May 2024, 21:20 वाजता

बीड जिल्ह्याच्या विकासासाठीच मी प्रयत्न करत आहे. या विकासाची, बीड जिल्ह्यातील जाती जातीच्या सुलोख्याची तस्करी होऊ देऊ नका-  पंकजा मुंडे यांनी जनतेला घातली साद 

7 May 2024, 21:05 वाजता

मतदानाची टक्केवारी कमी जरी वाटत असली तरी आमच्या कार्यकर्त्यांनी मतदान करून घेतले आहे. आमची लोक आम्हाला मतदान करत आहेl. घाबरण्याची गरज नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

7 May 2024, 20:39 वाजता

4 जूनला महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पाच जूनला मीध्यांना उलट लटकवून असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. धुळ्यामध्ये काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचार सभेत निमित्ताने उद्धव ठाकरे धुळ्यात आले होते. यावेळेस त्यांनी प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे. चार जून रोजी महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात सत्तारूढ होईल आणि त्यानंतर पाच जूनला मिंध्यांना उलट टांगु असा इशारा त्यांनी दिला आहे.

7 May 2024, 19:16 वाजता

मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सोलापुरात काँग्रेसचा जल्लोष. निकालापूर्वीच काँग्रेसला विजयाचा आत्मविश्वास. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष. रामलाल चौक ते भैय्या चौकापर्यंत घोषणाबाजी करत पदयात्रा. राम सातपुते आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस आयुक्त एम. राजकुमार घटनास्थळी दाखल.

7 May 2024, 19:05 वाजता

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्या डोक्यात फरक पडल्याची बोचरी टीका काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाही शासकीय कार्यालयातून निवडणूक प्रचार आणि आता ईव्हीएम ची पूजा त्यांनी केल्याने त्यांना आयोगाच्या कार्यालयात बसू देणार नाही असाही ईशारा सव्वालाखे यांनी दिला आहे. रूपाली चाकणकर ह्या नॉर्मल नसून त्यांची तात्काळ वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी करा अशीही मागणी संध्या सव्वालाखे यांनी केली.

7 May 2024, 18:07 वाजता

मतदान करायला गेले अन् यादीतून नावच गायब; अनेकजण मतदानापासून वंचित राहणार, लातूरमधील प्रकार

7 May 2024, 17:34 वाजता

धाराशिव मध्ये मतदानाचा टक्का घसरला; दिवसभरात शांततेत पार पडल मतदान

7 May 2024, 17:31 वाजता

सातारा लोकसभा मतदारसंघ सायंकाळी 5 पर्यंत 54.1 % मतदान