बापरे! समुद्राच्या तळाशी सापडला इतका मोठा खड्डा ज्याचा अंतच नाही; संशोधकही अवाक्

world News : समुद्राच्या तळाशी अनेक गुपितं दडली आहेत. हीच गुपितं हळुहळू जगासमोर येत असून, आता सर्वांनाच अवाक् करू लागली आहेत.   

सायली पाटील | Updated: May 10, 2024, 03:41 PM IST
बापरे! समुद्राच्या तळाशी सापडला इतका मोठा खड्डा ज्याचा अंतच नाही; संशोधकही अवाक्  title=
Scientists discovered deep sea blue hole where no one could reached the bottom

world News : जगाची उत्पत्ती कशी झाली यामागं अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. आजवर संशोधकांनीही त्यांच्या परीनं जगाच्या उत्पत्तीमागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या साऱ्या संशोधनांमध्ये आता आणखी एक अतिशय कमाल गोष्टीचा खुलासा झाला आहे. समुद्राच्या पोटात, अगदी खोलवर असणाऱ्या एका खड्ड्यानं जगभरातील संशोधकांना हैराण केलं आहे. 

मेक्सिकोच्या युकाटन बेटामध्ये समुद्राच्या तळाशी असणाऱ्या या अतिशय खोल खड्ड्याचं अस्तित्वं असल्याची बाब समोरं आली आहे. हा खड्डा इतका मोठा आहे, की तो आतापर्यंतचा जगातील सर्वाधिक खोलीचा खड्डा ठरत आहे. ‘ताम जा ब्लू होल’ असं या खड्ड्याचं नाव असून, तो चीनमध्ये असणाऱ्या ड्रॅगन होलपेक्षाही अधिक जास्त खोल असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जगात 390 फूट खोल चीनमधील हा खड्डा सर्वात मोठा असल्याचं सांगण्यात येत होतं. पण, आता मेक्सिकोमधील हा खड्डाच संपूर्ण जगाचं लक्ष वेधत आहे. 

हेसुद्धा वाचा : Bhendwal Ghatmandni : पाऊस- पाणी, नैसर्गिक आपत्ती? काही तासांत महाराष्ट्रातील सर्वात मोठी भविष्यवाणी 

शास्त्रज्ञांच्या मते हा ब्लू होल इतका खोल आहे की त्याचा अंत अद्याप सापडू शकला नाहीय.  फ्रंटियर्स इन मरीन साइंस जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार एका स्कूबा डायव्हिंग अभियानाअंतर्गत नव्यानं या ‘ताम जा ब्लू होल’ची माहिती मिळाली, ज्याची खोली समुद्रतळापासून साधारण 1380 पर्यत असावी. अभ्यासकांच्या मते या खोल ब्लू होलमध्ये अनेक गुंफा आणि भुयारं असावीत जिथं अशा काही जीवांचा वावर असेल जी मनुष्यानं आजवर कधीच पाहिली नाहीत. 

ब्लू  होल तयार होण्याची कहाणी अतिशय रंजक 

डिस्कव्हरीच्या माहितीनुसार ब्लू होल या उभ्या सागरी गुफाच आहेत. जी हिमयुगादरम्यान, एखाद्या हिमनदीपासून तयार झालेली असू शकते. हे महाकाय सिंक होल सहसा समुद्रतळाशी अतिशय खोलवर असतात, जिथं ऑक्सिजनची प्रचंड कमतरता असते. या खड्ड्यांमध्ये हायड्रोजन सल्फाइड वायू असून, 2012 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणामध्ये या ब्लू होलमध्ये अनेक बॅक्टेरियाचा वावर असल्याची बाबही समोर आली होती. सध्या या ब्लू होलसंदर्भातील पुढील निरीक्षणं अद्याप सुरु असून, आता नव्यानं आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.