मद्यपानानंतर त्रास झाल्याने Painkillers खाल्ल्या! सोशल मीडिया इनफ्युएन्सरचा मृत्यू

Social Media Influencer Died After Taking Painkillers After Hangover: ही तरुणी तिच्या जोडीदाराबरोबर मद्यपान करण्यासाठी गेली होती. घरी आल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 10, 2024, 08:58 AM IST
मद्यपानानंतर त्रास झाल्याने Painkillers खाल्ल्या! सोशल मीडिया इनफ्युएन्सरचा मृत्यू title=
38 दिवसांपासूनची झुंज अपयशी

Social Media Influencer Died After Taking Painkillers After Hangover: मद्यपान केल्याने होणारा त्रास कमी करण्यासाठी म्हणजेच हँगओव्हरनंतर वेदना कमी करणाऱ्या गोळ्या (पेनकिलर) घेतल्याने एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्यूएन्सरचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येनं फॉलोअर्स असलेल्या या तरुणीच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मरण पावलेल्या या तरुणीचं सोशल मीडियावरील नाव 'रशियन नाना' असं असं होतं. ती वर्षभरापूर्वीच रशियामधून चीनमधील गोंइझू प्रांतात स्थायिक झाली होती. मागील 38 दिवसांपासून ही तरुणी कोमात होती. रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

प्रेमात पडली अन् चीनमध्येच राहू लागली

शिक्षणासाठी रशियामधून चीनमध्ये आलेली ही तरुणी येथील वँग नावाच्या टॅट्यू काढणाऱ्याच्या प्रेमात पडली. वँगबरोबर राहता यावं म्हणून तिने शिक्षण संपल्यानंतरही चीनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या 'रशियन नाना' आणि वँगची लव्ह स्टोरी चांगलीच व्हायरल झाली. या व्हायरल लव्ह स्टोरीमुळेच तिला चीनमध्ये 'रशियन नाना' हे टोपण नाव मिळालं.

हँगओव्हरनंतर घेतलेल्या पेनकिलर्स

'टीकटॉक'प्रमाणे चीनमध्ये प्रसिद्ध असलेल्या 'ड्यूईन' नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या 31 वर्षीय तरुणीला 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. 'मिन न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही तरुणी पहिल्यांदा 27 मार्च रोजी आजाची पडली. वँग आणि ती त्यांच्या काही मित्रांबरोबर मद्यपान करण्यासाठी गेले होते. मात्र या भेटीत मद्यपान केल्यानंतर सायंकाळी तिला अस्वस्थ वाटू लागलं. दारुची नशा अधिक झाल्याने काही पेनकिलर घेऊन ही तरुणी झोपी गेली. मात्र नंतर ती बेशुद्ध झाली.

(Image: Jam Press)

मागील महिन्याभराहून अधिक काळापासून पोस्ट करत होता फोटो

या तरुणीची पेनकिलर घेतल्यानंतर जी शुद्ध हरपली ती कायमची. तिला उठवण्याचा बराच प्रयत्न वँगने केला. मात्र तिला शुद्धच आली नाही. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चीनमधील 'शाईन' या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार वँग ती आजारी असल्याच्या स्टोरी मागील महिन्याभरापासून शेअर करत होता आणि चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करत होता.

तिचं अखेरचं चुंबन...

रविवारी या तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती वँगनेच सोशल मीडियावरुन दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नानाच्या माथ्यावर चुंबन घेतानाचा फोटो शेअर करत वँगने, "ती आपल्याला कायमची सोडून गेली. काल ती जिवंत असताना घेतलेलं हे चुंबन शेवटचं ठरलं. आता मला कधीच तिचं चुंबन घेता येणार नाही," अशी कॅप्शन वँगने या फोटोला दिली आहे.

(Image: Jam Press)

आता या तरुणीने नेमक्या कोणत्या गोळ्या घेतल्या होत्या याचा तपास केला जात आहे.