Zombie Drug: औषध पिऊन माणसं बनतायत Zombie? कोरोनानंतर आणखी महाभयंकर महामारी?

ही झोम्बीची दहशत पसरण्यामागचं कारण आहे एक औषध. झायलाजीन (Xylazine) नावाच्या औषधांमुळेच लोकांमध्ये झोम्बी व्हायरस (Zombie Virus) वेगानं पसरत असल्याचं सांगितलं जातंय.

Updated: Feb 24, 2023, 10:45 PM IST
Zombie Drug: औषध पिऊन माणसं बनतायत Zombie? कोरोनानंतर आणखी महाभयंकर महामारी? title=

Zombie Drug: कोरोनाच्या (Corona) महामारीनंतर हळूहळू जग पूर्वपदावर येतंय अशातच अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. अमेरिकेत रस्त्यावर लोक चित्र विचित्र हावभाव करताना दिसत आहेत. या लोकांकडे पाहिल्यानंतर हजारो वर्षांपूर्वीचा झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला जातोय.

ही झोम्बीची दहशत पसरण्यामागचं कारण आहे एक औषध. झायलाजीन (Xylazine) नावाच्या औषधांमुळेच लोकांमध्ये झोम्बी व्हायरस (Zombie Virus) वेगानं पसरत असल्याचं सांगितलं जातंय. याचे फोटो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतायेत. 

झायलाजीन (Xylazine) औषध प्राण्यांसाठी बनवण्यात आलं असून त्याचा वापर प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी केला जातो. मात्र हेच औषध माणसांनी घेतलं तर ती झोम्बीसारखं वागू लागतात. सुरूवातीला या औषधांचा वापर फिलाडेल्फियात झाला. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजिलिस आणि इतर मोठ्या भागातही झायलाजीनचा साठा पोहचलाय. या औषधांमुळे अनेकांची त्वचा सडू लागलीय. या औषधाचे परिणाम इतके घातक आहेत की, बाधित व्यक्तीचा एखादा अवयवही कापून टाकावा लागू शकतो. 

अलिकडेच रशियन शास्त्रज्ञांनी तब्बल 48 हजार वर्षं बर्फाखाली दाबल्या गेलेल्या एका व्हायरसला जिवंत केल्याचा दावा फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी केला होता. या व्हायरसचं वैज्ञानिक नाव पंडोराव्हायरस एडिमा असं आहे. या बातमीनंतर आता अमेरिकेत झोम्बीचे रूग्ण आढळून आलेत. त्यामुळे पुन्हा एकदा सा-या जगाचं टेन्शन वाढलंय.