...अन् डॅनी यांनी पुन्हा सलमानबरोबर कधीच काम न करण्याची शपथ घेतली, 23 वर्षं सुरु होतं शीतयुद्ध

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे एकमेकासंह काम करणं टाळतात. यामागे भुतकाळातील काही घटना जबाबदार असतात. डॅनी यांनीही अशाच एका अनुभवानंतर सलमान खानसह पुन्हा काम न करण्याची शपथच घेतली होती.   

शिवराज यादव | Updated: Apr 27, 2024, 08:04 PM IST
...अन् डॅनी यांनी पुन्हा सलमानबरोबर कधीच काम न करण्याची शपथ घेतली, 23 वर्षं सुरु होतं शीतयुद्ध title=

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे एकमेकासंह काम करणं टाळतात. यामागे कधी अहंकार तर कधी भुतकाळातील काही घटना जबाबदार असतात. जर तुम्ही नीट विचार केला तर ज्येष्ठ अभिनेते डॅनी आणि सलमान तुम्हाला काही मोजक्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले असतील. याचं कारण यामागे एक घटना जबाबदार आहे. डॅनी यांनी 1991 मध्ये सलमान खानसह पुन्हा काम न करण्याची शपथच घेतली होती. 

1991 मध्ये सलमान खानचा 'सनम बेवफा' नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाची कथाच नाही तर गाणीही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सलमान खान तेव्हा बॉलिवूडमध्ये नवखा होता आणि यशाचं शिखर गाठण्याचं स्वप्न पाहत होता. या चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची भूमिका डैनी डैंगजोंगपा यांनी निभावली होती. त्या चित्रपटातील डॅनी यांच्या पात्राचं नाव शेरखान होतं जो एक गर्विष्ठ आणि हट्टी सावकार होता.

डॅनी यांची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. मात्र चित्रपटाच्या सेटवर असं काही झालं होतं, ज्यामुळे डॅनी सलमान खानवर प्रचंड नाराज झाले होते आणि त्यांनी पुन्हा सलमानसह काम न करण्याचा निर्णय घेतला होता. नेमकं असं काय झालं होतं, ज्यामुळे सलमान खान आणि डॅनी यांच्यात वाद झाला होता?  तब्बल 23 वर्षं दोघांमध्ये हे कोल्ड वॉर सुरु होतं. 

डॅनी यांनी 1971 मध्ये गुलजार यांच्या 'मेरे अपने' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सलमान खानचा 'मैने प्यार किया' सुपरहिट झाला, तोपर्यंत डॅनी हे बॉलिवूडमधील मोठं नाव झालं होतं. चित्रपटसृष्टीत डॅनी यांचा सगळेच आदर करतात. कारण ते फार शिस्तप्रिय आहेत. ते कधीही सेटवर स्टार असल्याचे नखरे दाखवत नाहीत. ते वक्तशीर असून शुटिंगसाठी नेहमीच वेळेत सेटवर पोहोचतात. तसंच जे वेळेचं पालन करत नाहीत त्यांच्यावर ते फार चिडतात. असं म्हणतात की, सनम बेवफाच्या शुटिंगदरम्यान सलमान खान सेटवर नेहमी उशिरा येत असे.  

अनेकदा तर सलमान खान इतका उशीर करायचा की, डॅनी त्याची वाट पाहून दमून जायचे. डॅनी यांनी एक-दोन वेळा सलमान खानला वेळेत येण्यासाठी समजावण्याचाही प्रयत्न केला. पण सलमान खानला त्याचा काही फरक पडला नाही. एके दिवशी डॅनी यांचा संयम सुटला. असं म्हणतात की, डॅनी यांनी सलमान खानला सर्वांसमोर सुनावलं होतं. त्यांनी सलमान खानचा क्लासच घेतला होत. यानंतर सलमान खान आणि डॅनी यांच्यातील बोलणं कमी झालं होतं. अखेर कसंतरी चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झालं आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपट हिट झाला. 

पण या चित्रपटानंतर डॅनीने पुन्हा कधी सलमानसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. सनम बेवफानंतर डॅनी यांच्याकडे अशा अनेक चित्रपटांची ऑफर आली, ज्यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत होता. पण डॅनी यांनी सर्व ऑफर्स नाकारल्या. अखेर 2014 मध्ये दोघांमधील हे शीतयुद्ध संपलं. 'जय हो' चित्रपटाच्या निमित्ताने डॅनी आणि सलमान खान यांनी एकत्र काम केलं.