लेकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माचे कमबॅक, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने अकाय असे त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठेवलं आहे. 

नम्रता पाटील | Updated: Mar 28, 2024, 07:42 PM IST
लेकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माचे कमबॅक, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाली... title=

Anushka Sharma Instagram Post : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने अकाय असे त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव ठेवलं आहे. अनुष्का ही सध्या तिच्या दोन्ही मुलांसोबत अकायसोबत लंडनमध्ये राहत आहे. तर विराट कोहली हा आयपीएलच्या सामन्यांसाठी भारतात आहे. याचदरम्यान आता अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

गेल्या महिन्याभरापासून अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर सक्रीय नसल्याचे पाहायला मिळत आहे. अनुष्काने 20 फेब्रुवारीला लेकाच्या जन्माची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिने कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. आता जवळपास महिन्याभराने अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. अनुष्काने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या तिने तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीशी संबंधित आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. यात ती एका लाकडाच्या बाकावर बसली असून तिच्या हातात मोबाईल पाहायला मिळत आहे. 

अनुष्काने या पोस्टला हटके कॅप्शन दिले आहे. सकाळचा सूर्य आणि माझा वनप्लस ओपनवर काहीतरी वाचन करण्याचा वेळ... यापेक्षा दिवसाची सुरुवात करण्याचा आणखी चांगला पर्याय कोणता, असे अनुष्काने म्हटले आहे. अनुष्काच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यात एकाने आम्ही तुला चिअर करताना मिस करतो, असे म्हटले आहे. तर एकाने अकायची आई अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्काच्या या पोस्टवर तिचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. 

दरम्यान आयपीएल दरम्यान अनुष्का भारतात परत येण्याची शक्यता आहे. अकाय आता दीड महिन्यांचा होईल आणि जन्माच्या एक महिन्यानंतर नवजात मुलांना बहुतेक विमानाने प्रवास करण्याची परवानगी दिली जाते. अकाय सध्या त्याची आई अनुष्का आणि बहीण वामिका कोहलीसह लंडनमध्ये राहतोय.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2018 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षानंतर या कपलने 2021 मध्ये त्यांची पहिली मुलगी वामिकाचं स्वागत केलं. तर फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी अकायच्या जन्माची गुडन्यूज दिली. अनुष्का सध्यातरी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.