'मुन्ना भाई एमबीबीएस' मध्ये सर्किट नाही तर अरशद वारसीच्या भूमिकेचं होतं 'हे नाव! ऐकताच पोट धरून हसाल

Arshad Warsi Circuit Character Name :  अरशद वारसीनं एका मुलाखतीत त्याच्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटातील सर्किटच्या भूमिकेविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 19, 2024, 12:13 PM IST
'मुन्ना भाई एमबीबीएस' मध्ये सर्किट नाही तर अरशद वारसीच्या भूमिकेचं होतं 'हे नाव! ऐकताच पोट धरून हसाल title=
(Photo Credit : Social Media)

Arshad Warsi Circuit Character Name : बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी 'सर्किट' च्या नावानं खरी ओळख मिळाली होती. त्याची 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटातील ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान, आज 19 एप्रिल रोजी अरशद वारसीचा 56 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्याच्या या भूमिकेविषयी काही न माहित असलेल्या गोष्टी जाणून घेऊया. अरशदच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे आजही लोक त्याला सर्किट म्हणून ओळखतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरसद वारसीनं स्वत: या भूमिके मागची कहानी सांगितली आहे. 

सर्किट नाही तर होतं 'हे' नाव

अरशद वारसीनं एका मुलाखतीत सांगितलं की त्याच्या या भूमिकेचं नाव आधी सर्किट नव्हतं. तर खुजली होतं. त्याचे कपडे आणि त्याची वागणूकही काही विचित्र होती. त्यानं म्हटलं की तुम्ही जर ते नाव ऐकलं असतं तर तुम्हाला लगेच वाटल असतं की हा फक्त खाजवत राहतो. त्याहून जास्त काय करु शकतो, त्यामुळे सगळं खराब असल्याचं वाटलं असतं. अरशद वारसीनं सर्किटच्या भूमिकेसाठी खूप मेहनत केली होती.

अरशदनं सांगितलं की त्यानं राजकुमार हिरानी यांना चित्रपटातील या भूमिकेचं नाव बदलायला सांगितलं होतं. त्याशिवाय त्याचे कपडे देखील बदलण्याविषयी चर्चा केली. त्यानं पुढे सांगितलं की शूटिंग सुरु होईपर्यंत राजकुमार हिरानी यांना त्याच्या सेन्स ऑफ ह्यूमरविषयी माहित नव्हतं. त्यानं काही मजेशीर गोष्ट सांगितल्या की चित्रपटातील काहीकाही सीन तर असे होते, ज्यात सगळं काही अरशदनं केलं आहे. चित्रपटातील सीनन्सना आणखी चांगलं करण्यासाठी त्यानं खूप मेहनत केली.

हेही वाचा : Chamkila साठी परिणीतिनं सोडला 'अ‍ॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्ला

अरशदनं पुढे सांगितलं की 'मुन्ना भाई एमबीबीएस' मध्ये मुख्य भूमिका साकारण्यासाठी संजय दत्तनं देखील त्यानं दिलेल्या काही आयड्यांचे समर्थनं केलं होतं. त्यानं सांगितलं की संजय दत्त आणि त्याच्यात खूप चांगली बॉन्डिंग झाली होती. त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा अॅटिट्यूड नव्हता. त्या दोघांना एकमेकांसोबत काम करुन मज्जा आली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि अरशद वारसीशिवाय जिमी शेरगिल, ग्रेसी सिंह, बोमन ईरानी यांनी देखील काम केलं होतं. मुन्ना आणि सर्किट यांची जोडी खूप हिट झाली.