Chamkila साठी परिणीतिनं सोडला 'अ‍ॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्ला

Pareeniti Chopra : परिणीति चोप्रानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इम्तियाज अलीच्या ‘अमर सिंग चमकीला’ या चित्रपटासाठी 'अ‍ॅनिमल'ला नकार दिल्यानंतर तिच्या कलाकार मित्रांनी काय सल्ला दिला याचा खुलासा केला. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 19, 2024, 11:09 AM IST
Chamkila साठी परिणीतिनं सोडला 'अ‍ॅनिमल', तर कलाकार मित्रांना दिला 'हा' सल्ला title=
(Photo Credit : Social Media)

Pareeniti Chopra : सगळीकडे सध्या इम्तियाज अलीच्या ‘अमर सिंग चमकीला’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जेव्हापासून नेटफ्लिकसवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हा पासून हा चित्रपट चर्चेत आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील कहाणी, गाणी, दिलजीत दोसांझ आणि परिणीति चोप्राचा अभिनय खूप आवडला. या सगळ्यात परिणीतिनं अशा गोष्टीचा खुलासा केला आहे ज्यानं सगळ्यांना धक्का बसला आहे. तिनं सांगितलं की अनेकांनी तिला हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता. 

'चमकीला' या चित्रपटात परिणीतिनं चमकिलाची दुसरी पत्नी अमरजोतची भूमिका साकारली होती. परिणीतिनं तर संदीप रेड्डी वांगाचा 'अ‍ॅनिमल'ला नकार देत इम्तियाज अलीच्या 'चमकीला' ला साइन केलं. याविषयी परिणीतिनं 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. परिणीति म्हणाली, "मला आजही आठवण आहे की मी माझ्या अनेक कलाकार मित्रांना सांगितलं की 'मी हा चित्रपट करते आणि यासाठी मी माझं वजन देखील वाढवणार आहे.' त्यांच्यातील अनेकांचे म्हणणे होते की "काय? तू पागर झालीये? तुझं डोकं खराब झालं आहे का? तू तुझं करिअर संपवायला जातेस. मी त्या लोकांचं म्हणणं ऐकलं नाही कारण माझं मन आणि डोकं दोन्ही मला सांगत होतं की हा चित्रपट कर, तू हा चित्रपट करायलाच हवा." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परिणीतिनं पुढे सांगितलं की "या चित्रपटासाठी मी दोन वर्षांपासून शूट करत होती. त्यामुळे मी अनेक चित्रपट गमावले. मी खूप खराब दिसू लागली होती आणि लोकांनी दुसरीकडे तर्क लावला की मी प्रेग्नंट आहे. मी बोटॉक्स केले आहे आणि माझ्याविषयी विविधप्रकारच्या अफवा सुरु झाल्या. तुम्ही मला कोणत्याही रेड कार्पेटवर पाहिलं नाही कारण माझं वजन वाढलं होतं. मी याच कारणामुळे लग्न केलं. आता जेव्हापण मी माझ्या लग्नाचे फोटो पाहिनं तेव्हा मला ‘अमर सिंग चमकीला’ ची आठवण येईल." 

हेही वाचा : Mr India चित्रपटात झळकलेली 'ती चिमुरडी आता काय करते? चित्रपटसृष्टीपासून लांब करते 'हे' काम

'चमकीला' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात दिलजीतनं अमर सिंह चमकीलाची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटात आपल्याला अमर सिंग चमकीला यांचं आयुष्य पाहायला मिळालं आहे. कमी वयात एल्विश ऑफ पंजाब अशी ओळख मिळवणाऱ्या अमर सिंग चमकीलाला लोकप्रियता मिळाली आणि वयाच्या 27 व्या वर्षी त्याचे आणि अमरजोतीचं निधन झालं.