बॉलिवूडमध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा "अग्नी" मध्ये दिसणार दमदार भूमिकेत

 2024 मध्ये सई बॉलिवूडमध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. 

Updated: May 4, 2024, 06:49 PM IST
बॉलिवूडमध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा "अग्नी" मध्ये दिसणार दमदार भूमिकेत title=

मुंबई : सई ताम्हणकर ने काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. २०२४ हे वर्ष सई साठी बॉलिवुडमय ठरतंय यात शंका नाही. " भक्षक " या हिंदी वेब शो नंतर आता सई "अग्नी" साठी सज्ज होत आहे. 2024 मध्ये सई बॉलिवूडमध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. "आंतरराष्ट्रीय फायर फायटर" दिवशी सईने "अग्नी"च पोस्टर शेअर केलं आहे. प्रतीक गांधी , जितेंद्र जोशी , दिवेंद्यू , सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट असलेला "अग्नी " लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रतीक गांधी या बड्या कलाकारांसोबत सई या आगामी "अग्नी" मध्ये दिसणार असून तिच्यासाठी हा प्रोजेक्ट खास आहे असं ती सांगते. एक्सेल एंटरटेनमेंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी तिला मिळाली असून या प्रोजेक्ट  बद्दल सई म्हणते, “एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. अग्नी हा प्रोजेक्ट्स नक्कीच माझ्यासाठी खूप खास आहे. एवढ्या बड्या स्टार्ससोबत काम करण्याचा अनुभव खूप कमालीचा होता. आज "आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिवशी" अग्नी चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. हा चित्रपट खूप वेगळा असणार असून तो नक्कीच प्रेक्षकांना एक वेगळा संदेश देऊन जाणार आहे " 

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई 'डब्बा कार्टेल'मध्ये सुद्धा दिसणार आहे. या  वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर "डब्बा कार्टेल" रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या  चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. 2024 मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे आणि हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय.