झांझरिया... 28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स

Suniel Shetty And Karisma Kapoor Dance on Jhanjhariya song : करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांचा रोमॅन्टिक डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Apr 26, 2024, 01:19 PM IST
झांझरिया...  28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स title=
(Photo Credit : Social Media)

Suniel Shetty And Karisma Kapoor Dance on Jhanjhariya song : डान्स रिअ‍ॅलिटी शो 'डान्स दीवाने 4' नं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या शोमध्ये असलेले स्पर्धक उत्तम डान्स करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. तर दुसरीकडे करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित आणि गोविंदा परिक्षकाच्या भूमिकेत दिसतात. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर परफॉर्म केलं. दरम्यानं, त्यांच्या या परफॉर्मन्सनं सगळ्यांची मनं जिंकून घेतली त्याचं कारण म्हणजे 90 च्या दशकातील लोकप्रिय गाण्यावर त्या दोघांनी डान्स केला. त्या दोघांचा डान्स परफॉर्मन्स पाहून माधुरी दीक्षित शिट्या वाजवू लागली. 

या वेळी सेलिब्रेशन स्पेशल गेस्ट असा एक एपिसोड होता. नुकताच या शोमध्ये गोविंदा दिसला आणि आता करिश्मा कपूर दिसली. त्यावेळी करिश्मानं फक्त माधुरी दीक्षितसोबत डान्स केला नाही तर सुनील शेट्टीसोबत देखील डान्स केला आहे. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कृष्णा' या चित्रपटात सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर दिसले होते. या चित्रपटातील 'झांझरिया उसकी छनक गयी' हे गाणं तर आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर आता त्या दोघांनी पुन्हा एकदा त्यावर डान्स केला आहे. या प्रोमोमध्ये कॉमेडियन भारती सिंग ही सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर यांना याच गाण्यावर डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलावते. तर त्यांच्या या स्पेशल डान्ससाठी राजस्थानवरून खास वाळू आणल्याचं देखील ती सांगते. भारती सिंगचं हे वक्तव्य ऐकताच तिथे उपस्थित असलेले सगळ्यांना हसू अनावर होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : VIDEO : 'एsss! ते परत ठेव...', मुंबईत पोहोचताच इतका का चिडला ज्युनियर एनटीआर?

या व्हिडीओत त्या दोघांची पुन्हा एकदा 'झांझरिया उसकी छनक गयी' या गाण्यावर असलेली केमिस्ट्री पाहायला मिळाली. तर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'ही हिट जोडी आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आजही माझ्या मोबाईलमध्ये हे गाणं आहे. हे गाणं मला खूप आवडतं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सुनील शेट्टीचा अंदाज खूप आवडतोय.' तर आणखी एका नेटकऱ्यानं कमेंट करत 'त्याला करिश्माचा अंदाज आवडल्याचे म्हटले आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'फायरिंग परफॉर्मन्स आहे.'