'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार

Taarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Gurucharan Singh : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांनी केली पोलिसात तक्रार

दिक्षा पाटील | Updated: Apr 26, 2024, 06:18 PM IST
'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रार title=
(Photo Credit : Social Media)

Taarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Gurucharan Singh : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. ही बातमी त्याचे वडील दिल्ली पोलिसांनी दिली आहे. त्याच्या वडिलांप्रमाणे गुरुचरण सिंग हा सोमवारी मुंबईला येण्यासाठी घरून निघाला होता. त्यावेळी तो दिल्ली एअरपोर्टसाठी घरून निघाला होता. पण तो मुंबईला पोहोचला नाही किंवा परत घरी देखील आला नाही.

'ईटाइम्स'नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, गुरुचरण सिंगच्या वडिलांनी पोलिस स्टेशन जात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की 'माझा मुलगा गुरुचरण सिंग, वय: 50 वर्ष, 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. तर त्यासाठी फ्लाइटनं जाण्यासाठी तो दिल्ली एअरपोर्टला गेला होता. पण तो नाही मुंबईला पोहोचला नाही परत घरी परतला. त्याचा फोन देखील नाही आला. तो मानसिक रित्या स्थिर होता. आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो बेपत्ता आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : घटस्फोटानंतर समांथानं मिटवली लग्नाची निशाणी, वेडिंग ड्रेसची केली अशी अवस्था

दरम्यान, गुरुचरण सिंगनं या मालिकेत त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात जागा केली. त्याची भूमिका ही सगळ्यांना खूप आवडत होती. त्या मालिकेत गुरुचरण सिंगच्या  'ओ पापाजी' हा डायलॉग त्यावेळी खूप व्हायरल झाला होता. सगळ्या मुलांच्या तोंडात तोच डायलॉग असायचा. जेव्हा त्यानं ही मालिका सोडली त्यानंतर सगळ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. गुरुचरण सिंगला सगळ्यात शेवटी टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत पाहिलं आहे. त्यानं त्याच्या वडिलांच्या आरोग्याचे कारण सांगत मालिकेला रामराम केला होता. गुरुचरणनं 2020 मध्येच ही मालिका सोडली होती. त्यानंतर तो कोणत्या मालिकेत दिसला नाही. त्याचं म्हणणं होतं की त्याला त्याचं संपूर्ण लक्ष हे कुटुंबाला द्यायचं आहे. मात्र, निर्मात्यांनी इतर कलाकारांप्रमाणेच मालिका सोडणाऱ्या गुरचरणला देखील मानधन दिलं नाही. जेव्हा जेनिफर मिस्त्रीनं या सगळ्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा निर्मात्यांनी त्यांचे मानधन दिले. तर आता या मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका ही बलविंदर सिंग साकारत आहे.