धक्कादायक! भारतात 'या' भागात बर्ड फ्लूचा उद्रेक, पाहा आजाराची लक्षणे अन् उपाय

Kerala Bird Flu Outbreak: भारतात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. बर्ड फ्लू हा एक आजार असून, जो प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो. जाणून घ्या हा आजार माणसांसाठी किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत? 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 23, 2024, 03:09 PM IST
धक्कादायक! भारतात 'या' भागात बर्ड फ्लूचा उद्रेक, पाहा आजाराची लक्षणे अन् उपाय title=

Kerala Bird Flu Outbreak news in Marathi: अमेरिकेनंतर आता भारतात देखील बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सरकार सक्रिय झाली असून केरळमध्ये बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण समोर आला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी केरळ सार्वजनिक आरोग्य कायदा, 2023 अंतर्गत अलाप्पुझाच्या दोन विभागात बर्ड फ्लूचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या संचालकांना पुढील कारावाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवालानुसार, बर्ड फ्लूचे केंद्र असलेल्या एडथुआ आणि चेरुथना येथे सुमारे 21 हजार पक्षी मारले जाणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त, प्रादुर्भाव क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या आतील सर्व पाळीव पक्षी मारले जातील. केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील हजारो पक्ष्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा H5N1 या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हा आजार माणसांसाठी किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत ते जाणून घ्या.

केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात पाळण्यात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये एडथवा ग्रामपंचायत विभाग 1 आणि चेरुठाणा ग्रामपंचायत विभाग 3 मधील एका भागात बर्ड फ्लुचीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुसंवर्धन विभागाने 12 सीमा तपासणी बिंदूंवर चोवीस तास जागरुकता ठेवली आहे. प्रत्येक चेकपोस्टवर एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि इतर चार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोंबड्यांचे मांस, अंडी आणि बदकांची वाहतूक करणारी वाहने बंद करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच 12 एप्रिलपासून एडठवा येथे 3 हजार पक्षी तर चेरुठाणा येथे 250 पक्षी मारले गेले आहेत. मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत नेण्यात आले आणि त्यात एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) म्हणजेच बर्ड फ्लूची पुष्टी झाली. अधिकाऱ्यांनी बाधिक क्षेत्रात एक किलोमीटरच्या परिघात सर्व पाळीव मरून पक्षी नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एव्हीयन इन्फ्लूएंझा (H5N1) म्हणजे काय?

हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य संसर्ग आहे. जो प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो. बर्ड फ्लू लोकांमध्ये दुर्मिळ आहे, परंतु यामुळे गंभीर आजार होऊ शकतो. एव्हियन फ्लूला बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लू म्हणतात. हा आजार पहिल्यांदा 2003 मध्ये व्हिएतनाममध्ये आढळून आला होता. हा पक्ष्यांचा रोग आहे, जो खूप जीवघेणा आहे. हा रोग जंगली पक्ष्यांपासून पाळीव पक्ष्यांमध्ये पसरतो. बर्ड फ्लूचा संसर्ग मानवांनाही होऊ शकतो, परंतु ही शक्यता फारच कमी आहे. धूळीत असलेल्या या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. याशिवाय कोणत्याही संक्रमित वस्तूला स्पर्श करूनच संसर्ग होऊ शकतो. 

ही आहेत लक्षणे

तीव्र शरीर वेदना, उच्च ताप, सतत खोकला, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास, थंडी वाजणे

काय घ्याल काळजी?

- हा रोग कोंबडी, बदक, लहान पक्षी, हंस, टर्की इत्यादी पक्ष्यांना होऊ शकतो.
- संक्रमित पक्ष्यांच्या जवळ असणारे लोक पक्षी पाळणारे, पाळीव पक्ष्यांच्या संपर्कात असलेली मुले, गृहिणी, पशुवैद्यक आणि इतर संबंधित कर्मचारी यांनी संक्रमित पक्ष्यांजवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.