Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : मतदारांना, किंबहुना सर्वच स्तरातील आणि वयोगटातील मतदारांना मतदानाचं महत्त्वं पटवून देत लोकशाही राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचं योगदान मिळवण्यासाठी या मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे.   

Updated: Apr 26, 2024, 11:54 AM IST
Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?  title=
Loksabha Election 2024 Free Beers dosa on Voting day phase 2 latest news

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार निवडण्याचा अधिक नागरिकांना देण्यात आला आहे. मतदानाच्या माध्य़मातून आपले प्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानानं दिलेल्या अधिकाराअंतर्गत मिळतं. सध्या संपूर्ण भारतामध्ये हेच वातावरण आणि निवडणुकीप्रती असणारी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेपर्यंत ही निवडणूक पोहोचली असून जास्तीत जास्त संख्येनं मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातील मतदारानं मतदानाचा हक्क बजावावा यासाठी विविध मार्गांनी जनजागृती मोहिमा राबवण्यात येत आहेत. तर, अनेक मंडळी काही शकला लढवताना दिसत आहेत. 

मतदान करून आलेल्या सर्वांना मोफत खाणं, कॅब राईट, डोसा इतकंच काय तर अगदी मोफत बिअर देण्यापर्यंतच्या ऑफरही सुरु करण्यात आल्या आहेत. बंगळुरू येथे मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही मोफत मोहिम सुरु असून, मतदारांची चंगळ पाहायला मिळत आहे. 

मतदार राजा लक्ष दे.... 

बंगळुरूमध्ये यंदाच्या वर्षी जवळपास 1 कोटींहून अधिक मतदार मतदान करत आहेत. मतदानातं हे प्रमाण 100 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी म्हणून इथं अनेक हॉटेलं, पब, टॅक्सी अॅग्रीगेटर संस्थांकडून अनेक सुविधा मोफत देण्यात येत आहेत. खाण्यापिण्यापासून बिअरपर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी मतदारांना एक रुपयाही मोजावा लागत नाहीये, हो पण मत मात्र द्यावं लागतंय. मतदानानंतर ज्या हातावर मत दिल्याची खूण करण्यात येते ते बोट दाखवून सहजपणे या सवलतीचा लाभ मतदारांना घेता येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ... 

बंगळुरूतील नृपतुंगा रोड येथे असणाऱ्या निसर्ग ग्रँड हॉटेलमध्ये मतदारांसाठी मोफत बटर डोसा, घी राईस, शीतपेयं देण्यात येत आहेत. तर, बंगळुरूतीलच बेलंदूर (Bellandur) येथील एका रेस्टो पबमध्ये डेक ऑफ ब्रूज़ (Deck of Brews) येथे 27 आणि 28 एप्रिलला मतदान केलेल्या मतदारांना एक बिअर मग मोफत देण्यासोबत बिलात इतर सवलतीसुद्धा दिल्या जाणार आहेत. 

सोशल (SOCIAL) या पब चेनकडूनही मतदान प्रक्रियेला चालना देण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी खाण्यापिण्याच्या बिलावर 20 टक्क्यांची सवलत दिली जात आहे. या सवलतींच्या रांगेत रॅपिडोही मागे नाही. त्यामुळं तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतलं कोणी बंगळुरूमध्ये असेल तर त्यांच्यापर्यंत या सवलतींची माहिती पोहोचूद्या!!!

(मद्यपान शरीरास हानिकारक असून, अशा कृत्यांस झी 24 तास दुजोरा देत नाही.)