विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं 'जय श्री राम', शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : प्रश्नाचं उत्तर न आल्यास अतरंगी विद्यार्थी उत्तरपत्रिकेवर वाटेल ते लिहून मोकळे होतात. सोशल मीडियावर अनेकवेळा अशा उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक उत्तर पत्रिका व्हायरल होत असून यात विद्यार्थ्यांने उत्तराऐवजी जय श्री राम असं लिहिलंय.

राजीव कासले | Updated: Apr 25, 2024, 08:53 PM IST
विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं 'जय श्री राम', शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई title=

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या त्रुटी समोर आल्या आहेत. विद्यापीठातील प्राध्यापकाने उत्तरपत्रिका तपासणीत एका विद्यार्थ्या जास्त गुण दिले. या विद्यार्थ्याने प्रश्नांच्या उत्तरात जय श्री राम (Jai Shri Ram) मला पास करा असं लिहिलं होतं. यानंतरही प्राध्यापकाने त्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण केलं. याप्रकरणी विद्यार्थी नेते उद्देश्य आणि दिव्यांशु यांनी आरटीआय अंतर्गत माहिती मागवली. त्यानंतर विद्यापीठाबाहेरच्या शिक्षकांकडून उत्तरपत्रिकेचं पुन्हा मुल्यांकन करण्यात आलं. 

या विषयाची उत्तरपत्रिका प्राध्यापकाने तपासली होती त्यात विद्यार्थ्याला 52 पैकी 34 गुण देण्यात आले होते. पण त्याच उत्तरपत्रिका (Answer Sheet) जेव्हा बाहेरच्या शिक्षकांनी तपासले तेव्हा विद्यार्थ्याला शुन्य आणि चार गुण मिळाले होते. विद्यापीठाने हे प्रकरण गांभीर्याने घेत दोन प्राध्यापकांना कार्यमुक्त करण्यात आलं. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
 जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल विद्यापीठीत (Veer Bahadur Singh Purvanchal University) डी फार्मा कोर्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा पार पडली. यात उत्तर चुकीची असतानाही विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्यात आलं होतं. विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी नेता दिव्यांशु सिंह याला ही माहिती कळताच त्याने आरटीआय अंतर्गत माहिती मागवली. 

उत्तरपत्रिकेत लिहिलं होतं जय श्री राम
विद्यापीठातील एका प्राध्यापकाने पैसे घेऊन विद्यार्थ्याना उत्तीर्ण केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसंच उत्तरपत्रिका सदोष पद्धतीने तपासल्याचाही या प्राध्यापकावर आरोप होता. एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत जय श्री राम आणि खेळाडूंची नावं लिहिली होती. यानंतर ही प्राध्यापकाने त्याला उत्तीर्ण केलं. 

चौकशी समितीची स्थापना
हे प्रकरण बाहेर आल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. विद्यापीठीतर्फे एक समितीही स्थापन करण्यात आली असून दोन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. निष्पक्ष तपासणीसाठी उत्तरपत्रिका विद्यापीठाबाहेर शिक्षकांकडून तपासणी केल्यानतंर विद्यार्थ्याला शुन्य गुण मिळाला होता. 

ज्या शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे त्यांची नावं प्राध्यापक विनय वर्मा आणि आशिष गुप्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापैकी विनय वर्मा यांच्यावर याआधीही पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोप होता.

विद्यार्थ्याने वडिलांची मार्कशीट केली व्हायरल

दरम्यान, काही  दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याने चक्क आपल्या वडिलांची दहावीच मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. पास होण्यासाठी वडिल सारखे मागे लागत असल्याने रागावलेल्या मुलाने हे पाऊल उचचलं होतं.