ईदच्याच दिवशी सलमान हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, पण खान फॅमिलीचा तो निर्णय अन्...

Salman Khan News: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा पूर्ण प्लानच समोर आला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 23, 2024, 02:51 PM IST
ईदच्याच दिवशी सलमान हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, पण खान फॅमिलीचा तो निर्णय अन्... title=
bishnoi gang planned to target salman khan on eid and panvel farm house

Salman Khan News: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मुंबई क्राइम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या प्लाननुसार ईदच्याच दिवशी सलमानचे फार्म हाउस टार्गेटवर होते. मात्र, खान फॅमिलीच्या त्या एका निर्णयामुळं हल्लेखोरांचा प्लान फ्लॉप झाला. त्यानंतर बिश्नोई गँगने दुसरा प्लान बनवत गॅलेक्सी अपार्टमेंट टार्गेट केले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले संपूर्ण खान फॅमिली पनवेलच्या फार्म हाउसवर ईदचे सेलिब्रेशन करणार होती. त्यामुळंच हल्लेखोरांनी सलमानच्या फार्म हाऊसपासून 7 किमी अंतरावर दूर असलेल्या भागातच घर भाड्याने घेतले. मात्र, काही खासगी कारणास्तव ईदचे सेलिब्रेशन सोहेल खानच्या घरी ठेवण्यात आले. त्यामुळं बिश्नोई गँगने त्यांच्या प्लानच बदलला.

बिश्नोई गँगने 11 एप्रिल रोजी ईदच्याच दिवशी सलमान खानच्या घरी गोळीबार करण्याचा प्लान बनवला होता. त्यासाठी हल्लेखोरांनी 10 एप्रिल रोजी फार्म हाउस आणि गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही हल्लेखोर सलमानच्या घरी गोळीबार करण्याच्या हेतूने पोहोचले देखील होते. मात्र, अधिक गर्दी आणि पोलिस बंदोबस्तामुळं त्यांचा प्लान फसला. 

मुंबई गुन्हे शाखेला यासंबंधित सीसीटिव्ही फुटेजदेखील मिळाले आहेत. त्यात सलमान खानच्या घराजवळ 10 व 11 एप्रिल रोजी या हल्लेखोरांची बाइक पार्किंगमध्ये उभी होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या हल्लेखोरांना पनवेलमध्ये सलमान खानचा टार्गेट करायचे होते कारण जवळपास जंगलाचा परिसर असल्याकारणाने तिथेून त्यांना पळून जाणे सोप्पे होणार होते. 

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी वापरण्यात आलेली बंदूक गुजरातमध्ये सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर आरोपी गुजरातमध्ये पळून गेले होते. पोलिसांनी आरोपींना भूम येथून ताब्यात घेतले. मात्री गुन्ह्यात वापरलेली बंदूर मात्र पोलिसांना सापडली नव्हती. हा महत्त्वाचा पुरावा असल्याने पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत होता. त्यासाठी गुन्हे शाखेने गुजरातमध्ये पथके पाठवली होती. तापी नदीत शोधकार्य सुरू होते. 

आज 23 एप्रिल रोजी तापी नदीत पोलिसांना बंदूक सापडली आहे. एक बंदूक काल रात्री नदीत सापडले होते, तर आज एक सापडले आहे. या दोन्ही बंदूकांचा वापर गुन्ह्यात करण्यात आला होता.  आता पोलिस आरोपीच्या फोनच्या शोधात आहेत. तसंच, आरोपींवर मकोका लावण्याच्या तयारीत असल्याचेही समजतेय.