Loksabha Election 2024 Live Updates : 'चार दिवस सासूचे संपले आता' अजित पवारांचं शरद पवारांना उत्तर

Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर  

Loksabha Election 2024 Live Updates : 'चार दिवस सासूचे संपले आता' अजित पवारांचं शरद पवारांना उत्तर

Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस अतिशय खास असणार आहे. कारण, कोल्हापुरातून खुद्द शाहू छत्रपती महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असून, ते इथं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत घडणाऱ्या अनेक राजकीय घडामोडी येत्या काळात राज्याच्या राजकारणाला नवं वळण देण्यास कारणीभूत ठरू शकतात. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या टीकांवर कसं उत्तर देणार, सत्ताधाऱ्यांकडून कोणते चेहरे प्रभावी काम करत राजकीय रंगत वाढवणार... या सर्व घडामोडींच्या सर्व अपडेट्स तुम्हाला इथं पाहता येतील. 

 

16 Apr 2024, 23:05 वाजता

आता कोणाला काय वाटतं पण त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की तिकीट देणं की न देणं हे त्यांनी ठरवावे, मला त्यांनी सांगितलं की युतीतर्फे तुम्ही उभे राहा त्यामुळे मी तयार झालो, वातावरण हे चांगलं आहे, असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे.

16 Apr 2024, 19:53 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :
शरद पवारांनी बाहेरील पवार असा केलेला उल्लेख अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. अजित पवारांनी बारामतीमध्ये भाषण करताना शरद पवारांना उत्तर दिलंय. नवा काळ आहे... चार दिवस सासूचे संपले आता सुनेचे चार दिवस आलेत. त्याचबरोबर किती दिवस बाहेरची बाहेरची करणार. 40 वर्ष झाली तरी बाहेरची. किती वर्ष झाल्यावर घरची? असा सवालही अजित पवारांनी केलाय.

16 Apr 2024, 18:11 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :
निवडणुकीच्या काळानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात. असं सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केलंय... मूळ पवार यावरून दावे-प्रतिदावे आणि वैयक्तिक टीप्पणी सुरूये. त्यावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी हे विधान केलंय.  निवडणुकीच्या काळात दावे-प्रतिदावे आणि वैयक्तिक टीप्पणी होत असते असं त्या म्हणाल्या. 

16 Apr 2024, 17:50 वाजता

धाराशिवमध्ये महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्चना पाटील आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यलयात जाऊन दाखल केला. मुहूर्त साधत साधेपणाने  त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला. आता येत्या 19 तारखेला शक्ती प्रदर्शन करत आणखी एक अर्ज भरला जाणार आहे.

16 Apr 2024, 15:57 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या या प्रचार गीतामध्ये "शिवसेनेची मशाल"हा शब्द वापरण्यात आला आहे. त्याला शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे.निवडणूक आयोगाने पक्ष नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांना उबाठाची मशाल बोलायला लाज वाटते का?असा सवाल शिवसेनेच्या शिंदे गटाने केला आहे. 

16 Apr 2024, 15:17 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याच्या आरोपाला महाविकास उमेदवार शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.मी आरोपांना घाबरत नाही पण असे आरोप करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जातो आहे.हा रडीचा डाव असून हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन असं आव्हान शिंदे यांनी दिलं आहे. कपट कारस्थान करून माझं आयुष्य संपण्याचा प्रयत्न केला जातो आहे.लोकसभा निवडणुक होवू पर्यंत विरोधकांनी थांबावे त्यानंतर मला फासावर चढवायचे तर चढवा अशा शब्दात विरोधकांना उत्तर दिलं आहे.मला मिळणारे पाठबळ पाहून हे सगळे आरोप एका मागून एक केले जातायत असा आरोप देखील शशिकांत शिंदे यांनी केला आहे. 

 

16 Apr 2024, 15:13 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : भाजपचे चंद्रपूरचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे दिग्गज मंत्री छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत. चंद्रपूर या ओबीसीबहुल मतदारसंघात कुणबी समाजाच्या प्राबल्याची चर्चा असताना भुजबळ यांनी मूल येथे आयोजित प्रचारसभेत 400 पार चा नारा दिला. राज्यात ओबीसी समाजावर हल्ले होत असताना याच कुणबी समाजाच्या प्रतिभा धानोरकर यांनी निषेधाचा चकार शब्द काढला नसल्याचा हल्लाबोल भुजबळ यांनी थेट केला.  ओबीसी समाजावर अन्याय-अत्याचार झाल्यावर गप्प बसणारे कसे असतील ओबीसी असा सवाल त्यांनी विचारला

 

16 Apr 2024, 13:20 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं पक्षाचं चिन्हं असणाऱ्या मशाल चिन्हाला अनुसरून मशाल गीताचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. संजय राऊत, उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांनी यावेळी पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदते सहभाग घेतला होता. 

16 Apr 2024, 13:15 वाजता

16 Apr 2024, 13:01 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : माण खटाव विधानसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे नेते शेखर गोरेंनी शरद पवार यांची भेट घेतली. गोरेंनी रात्री उशिरा गोविंद बागेत माढा मतदारसंघाच्या रणनीती बाबत शरद पवारांशी तब्बल एक तास चर्चा केली. शेखर गोरे हे भाजपचे आमदार जयकुमार गोरेंचे सख्खे बंधू आहेत..ते गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात काम करतायत. त्यामुळे शेखर गोरेंची भूमिका महत्वाची ठरणारेय. या भेटीने माढा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या भेटीने माढा लोकसभा मतदारसंघात चर्चांना उधाण आलंय.