Loksabha Election 2024 Live Updates : 'चार दिवस सासूचे संपले आता' अजित पवारांचं शरद पवारांना उत्तर

Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर  

Loksabha Election 2024 Live Updates : 'चार दिवस सासूचे संपले आता' अजित पवारांचं शरद पवारांना उत्तर

Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस अतिशय खास असणार आहे. कारण, कोल्हापुरातून खुद्द शाहू छत्रपती महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असून, ते इथं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत घडणाऱ्या अनेक राजकीय घडामोडी येत्या काळात राज्याच्या राजकारणाला नवं वळण देण्यास कारणीभूत ठरू शकतात. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या टीकांवर कसं उत्तर देणार, सत्ताधाऱ्यांकडून कोणते चेहरे प्रभावी काम करत राजकीय रंगत वाढवणार... या सर्व घडामोडींच्या सर्व अपडेट्स तुम्हाला इथं पाहता येतील. 

 

16 Apr 2024, 08:34 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप सदस्यपदाचा राजीनामा पाठवलाय. जगताप यांनी सांगलीतून विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. 

16 Apr 2024, 08:34 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : एकीकडे विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला टोला लगावला. प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं. तसंच आघाडीत जागावाटप होत असताना कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूतही पक्षानं काढायची असते, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.  

16 Apr 2024, 08:31 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : कोल्हापुरातून मंगळवारी महविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.