Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

1 May 2024, 22:14 वाजता

'बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणारे कफन चोर', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

 

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : कोरोना काळात बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणारे कफन चोर अशा तिखट शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.. घोटाळ्यांची मालिकाच बाहेर काढणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.. मोदीजींच्या नेतृत्वात लस तयार झाली तर तुम्हाला मिरच्या का झोंबल्या असा बोचरा सवालही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केलाय..

1 May 2024, 21:36 वाजता

'महाराष्ट्रात भटकतोय मोदींचा आत्मा कारण कारायचाय मविआचा खात्मा', रामदास आठवलेंचा टोला

 

Ramdas Athawale : भटकती आत्मा या राजकीय वादात आता रामदास आठवलेंनीसुद्धा उडी घेतलीय... नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात भटकतो आहे आत्मा, कारण आम्हाला करायचा आहे माहविकास आघाडीचा खात्मा.. अशी कविता करत रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला...

1 May 2024, 20:14 वाजता

'हे मोदी सरकार नाही, गजनी सरकार', उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

 

Uddhav Thackeray on PM Modi : हे मोदी सरकार नाही तर गजनी सरकार असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलीय... मोदींनी गाईवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोलावं असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलंय..

1 May 2024, 19:36 वाजता

'शिंदेंकडून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी', अनिल परबांची टीका

 

Anil Parab : शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उमेदवारांवरून अनिल परबांनी भाजपवर टीका केलीय...किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्यात आलीय...त्यामुळे भाजपला हा भ्रष्टाचार मान्य होता का...? असा सवाल उपस्थित करत सोमय्यांनाच स्टार प्रचारक करा अशी खोचक टीका अनिल परबांनी केलीय...सोमय्यांमुळेच वायकर, यामिनी जाधवांना उमेदवारी मिळालीय...त्यामुळे प्रामाणिक भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वायकर, यशवंत जाधवांच्या सतरंजी उचलण्याचे नशिबी आल्याचं परबांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 May 2024, 18:47 वाजता

कोकणात भाऊबंदकी, सामंत वि. सामंत

 

Uday Samant : कोकणामध्ये भाऊबंदकी पहायला मिळतेय...सामंत विरुद्ध सामंत असा सामना सुरू झालाय...किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयावरील बॅनर बदललाय...उदय सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर होता...आता किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर लावण्यात आलेत...त्यामुळे किरण सामंत अद्यापही उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा तळ कोकणात सुरू झालीये...नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचाही फोटो काढून टाकण्यात आलाय..
 

1 May 2024, 17:16 वाजता

हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प, लोकल रुळावर घसरली

 

Harbor Railway traffic stopped : CSMT रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा लोकलचा डबा घसरला. मात्र लोकल रिकामी असल्यानं मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे पुन्हा हार्बर मार्गावरची वडाळा ते CSMT दरम्यानची वाहतूक ठप्प झाली. ही रिकामी लोकल पुन्हा एकदा रुळांवर आणत नाही तोपर्यंत वाहतूक बंद असणार आहे. विशेष म्हणजे सोमवारी दुर्घटना घडलेल्या ठिकाणीच पुन्हा एकदा अपघात झाला. 

1 May 2024, 16:09 वाजता

'देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणांचं काय झालं?',अमोल कोल्हेंचा सवाल

 

Amol Kolhe on  Devendra Fadnavis : माढाच्या पाण्यावरून अमोल कोल्हेंनी फडणवीसांना जाब विचारलाय...टाटा कोयनेचं पाणी महाराष्ट्राला देणार आणि ते पाणी वळवणार यासंदर्भात फडणवीसांनी घोषणा केली होती...2018 ला फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कमिटी केली होती...त्याचं एक टक्के ही काम झालं नाही...त्यामुळे पंतप्रधानांनी आधी फडणवीसांना याचा जाब विचारावा...मग पवारांवर टीका करावी असे खडेबोल कोल्हेंनी सुनावलेयत...

 

1 May 2024, 15:19 वाजता

सलमान खान घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

 

Salman Khan Case : सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन यान आत्महत्या केलीये...पोलीस कोठडीत आत्महत्या झाल्यानं याचा तपास राज्य सीआयडी करणारे...आरोपी अनुजनं चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येतेय...सलमान खान घरावर गोळीबार प्रकरणात अनुज थापननं हत्यारं पुरवल्याचा आरोप होता...सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केलीये...त्यांना 8 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये...त्यापैकी एक आरोपी अनुज थापननं आत्महत्या केलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

1 May 2024, 13:53 वाजता

नाशिकमध्ये समता परिषद कार्यकर्ते नाराज

 

Nashik Samata Parishad : नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर समता परिषदेचे कार्यकर्ते नाराज झालेत. समता परिषदेच्या दिलीप खैरे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. दिलीप खैरे भुजबळांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि कट्टर समर्थक आहेत. भुजबळ निवडणूक रिंगणात नसल्यानं समता परिषदेच्या पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे आता दिलीप खैरे 3 मे रोजी अर्ज भरणारेत. 

1 May 2024, 13:21 वाजता

नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर

 

Nashik Hemant Godse : नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झालीय...अखेर नाशिकमधील महायुतीचा तिढा सुटलाय...उद्याच गोडसे उमेदवारी अर्ज भरणार आहेत...शिंदे, फडणवीसांच्या उपस्थितीत गोडसे अर्ज दाखल करतील...नाशिकमध्ये अनेक नावांची चर्चा होती...मात्र, यात गोडसेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडलीय...त्यामुळे आता गोडसेंसमोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंचं आव्हान असणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा -