First victim of Heat Stroke : राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

First victim of Heat Stroke : राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

16 Apr 2024, 22:36 वाजता

पालघरमध्ये उन्हामुळे भोवळ आल्यानं 16 वर्षीय मुलीचा मृत्यू

 

First victim of Heat Stroke : पालघरमध्ये एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विक्रमगड मधील केव वेडगे पाडा येथील अश्विनी विनोद रावते या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा आज दुपारच्या सुमारास उष्माघाताने मृत्यू झाला  अश्विनी ही मनोर मधील एस.पी.मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती. आज अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्याने ती आई वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली होती.. तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

16 Apr 2024, 21:57 वाजता

दाभाडीत चिंतन बैठकीत भाजप कार्यकर्त्यांची हाणामारी

 

Malegaon BJP Rada : मालेगावात भाजप विरोधात असलेल्या चिंतन सभेत भाजप कार्यकर्त्यांनी राडा घातलाय. दाभाडीत करणी सेनेच्या कार्यक्रमाचे आयोजन दाखवून भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात चिंतन सभा होती. सभेत लावलेल्या बॅनरवरून राडा झाला. बैठकीत धुळ्याचे अनिल गोटे, डॉ. विलास बच्छाव, श्याम सनेर यांच्यासह आणि काँग्रेसच्या नाराज गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16 Apr 2024, 18:07 वाजता

निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात- सुनेत्रा पवार

 

Sunetra Pawar on Family Relation : निवडणुकीच्या काळानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात... असं सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केलंय... मूळ पवार यावरून दावे-प्रतिदावे आणि वैयक्तिक टिप्पणी सुरूये... त्यावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी हे विधान केलंय... निवडणुकीच्या काळात दावे-प्रतिदावे आणि वैयक्तिक टिप्पणी होत असते असं त्या म्हणाल्या.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16 Apr 2024, 17:16 वाजता

UPSCत महाराष्ट्रातून अनिकेत हिरडे, प्रियांका मोहिते चमकले

 

UPSC Result : UPSCचा निकाल जाहीर झालाय. देशात तब्बल 1 हजार 16 उमेदवार उत्तीर्ण झालेत. अनिकेत हिरडे, प्रियांका मोहिते हे मराठी उमेदवार UPSCत चमकलेत. अनिकेतनं 91वी तर प्रियांका मोहितेनं 595 वी रँक पटकावलीय. 347 उमेदवार खुल्या प्रवर्गातून...303 उमेदवार ओबीसी प्रवर्गातून.... तर 165 उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातून उत्तीर्ण झालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

16 Apr 2024, 16:55 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानच्या निवासस्थानी

 

CM Shinde will Meet Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर तातडीने तपास चक्र फिरली...मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिसांना सूचना करत सलमानची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली....लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री हजेरी लावत आहेत...त्यात वेळातवेळ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यापूर्वी गोळीबार झाला त्या दिवशी सलमान खानचे मित्र आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमानची घरी जाऊन भेट घेतली होती.

 

16 Apr 2024, 16:18 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानच्या निवासस्थानी जाऊन घेणार भेट

 

CM Shinde will Meet Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर तातडीने तपास चक्र फिरली...मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिसांना सूचना करत सलमानची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली....लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री हजेरी लावत आहेत...त्यात वेळातवेळ काढून मुख्यमंत्री शिंदे सलमान खानच्या निवासस्थानी  जाऊन त्याची भेट घेणार आहेत...यापूर्वी गोळीबार झाला त्या दिवशी सलमान खानचे मित्र आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलमानची घरी जाऊन भेट घेतली होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

16 Apr 2024, 14:38 वाजता

जागावाटप पूर्ण झालंय, बंडखोरी थांबवावी - उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray On Vishal Patil : सांगलीतून काँग्रेस नेते विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीत तणाव वाढलाय. तिन्ही पक्षांच्या अधिकृत जागावाटप झाल्यात... जर कोणी बंडखोरी करत असेल तर त्या त्या पक्षानं त्या थांबवाव्यात, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलाय. गद्दारी थांबवणं त्या पक्षाची जबाबदारी आहे, असे ठाकरेंनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 14:23 वाजता

विशाल पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू

 

Balasaheb Thorat & Sanjay Raut On Vishal Patil : विशाल पाटलांची मनधरणी करु असा सूर मविआच्या नेत्यांनी लावलाय.. सांगलीची जागा काँग्रेसची नैसर्गिक जागा आहे.. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे.. मात्र विशाल पाटील चुकीचं पाऊल उचलणार नाही याची काळजी घेऊ.. अशी भूमिका बाळासाहेब थोरातांनी घेतलीय.. तर वसंतदादा पाटलांनी कधीच काँग्रेसशी बेईमानी केली नाही..ती परंपरा सोडून विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार नाहीत.. असं संजय राऊतांनी म्हटलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 13:53 वाजता

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 26 एप्रिलला सुनावणी

 

Thackeray Vs Shinde : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 26 एप्रिलला सुनावणी होणार आहे....विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार आहे...राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र केले नाही म्हणून ठाकरे गटाने याचिका दाखल केलीय...तर मुंबई हायकोर्टात सुनावणी घेण्यासाठी शिंदे गटाने याचिका दाखल केलीय...या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात की हायकोर्टात सुनावणी होणार हे 26 एप्रिलला स्पष्ट होणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 13:41 वाजता

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी

 

Salman Khan Update : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीये.. दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.. गुजरातच्या भुजमधून त्यांना आता मुंबईत किला कोर्टात हजर करण्यात आलंय...त्याआधी दोघांची वैद्यकीय तपासणीसाठी जीटी रुग्णालयात करण्यात आली....विशाल ऊर्फ कालू आणि सागर पाल अशी या दोघांची नावं आहेत....या आरोपींकडून विदेशी पिस्तुलसह जिवंत काडतुसं, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलीये. मुंबईच्या गुन्हेशाखेनं गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केलीये..रविवारी पहाटे या दोघांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गेलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -