First victim of Heat Stroke : राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

First victim of Heat Stroke : राज्यात उष्माघाताचा पहिला बळी

16 Apr 2024, 13:01 वाजता

सांगलीत विशाल पाटील यांचं शक्तिप्रदर्शन

 

Sangli Vishal Patil : सांगलीत विशाल पाटलांच्या रॅलीला सुरुवात झालीय, शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील भूमिका जाहीर करणार आहेत.. विशाल पाटलांच्या रॅलीत मोठा जनसमूह लोटल्याचं दिसतंय.. मविआतला सांगलीचा वाद चिघळलाय...19 तारखेला 3 वाजेपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटलांनी व्यक्त केलीय...विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्यास चंद्रहार पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यताय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 12:19 वाजता

उदयनराजे भोसले यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

 

Udayanraje Bhosale On Sharad Pawar : शरद पवारांनी केलेल्या टीकेवर उदयन राजे भोसलेंनी आज प्रत्युत्तर दिलंय.. आपल्या जिल्ह्याचे प्रश्न बारामतीत सोडवावे लागतात त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटल्याची टीका उदयनराजेंनी केलीये.. बाहेरच्यांनी आपल्या जिल्ह्यात येऊन सांगू नये असा पलटवारही उदयनराजेंनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 11:56 वाजता

साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर

 

Loksabha Election 2024 : सातारामधून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...साता-याच्या जागेवर भाजपकडून उदयनराजे राजेंना उमेदवारी देण्यात आलीय...उदयनराजेंसमोर आता मविआच्या शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 11:34 वाजता

एसी सरकार समूहाचा महाराष्ट्रात शिरकाव

 

AC Sarkar : समांतर सरकारचा दावा करणारी संघटना 'एसी सरकार' समुहाचा महाराष्ट्रात शिरकाव झालाय.. या समुहानं थेट नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या समुहाचा स्तंभ उभारलाय.. थेट शिलालेख उभारल्यानं एकच खळबळ माजलीय.. शिलालेख स्तंभ उभारल्यानं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी परिसरात हातपाय पसरण्याचा या समुहाचा प्रयत्न मानला जातोय.. एसी सरकार समूह भारत सरकारला मानत नाही, ब्रिटनच्या राणीला आपली राणी मानतात.. नाशिक-गुजरातच्या सीमा भागात डांग परिसरात हा समूह सक्रिय आहे..  त्यामुळे सरकार आणि पोलिस काय कारवाई करतायत याकडे लक्ष लागलंय..

बातमी पाहा - महाराष्ट्रात 'एसी सरकार'चा शिरकाव, त्र्यंबकेश्वरमध्ये उभारला स्तंभ; काय आहे नेमकं प्रकरण?

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 11:03 वाजता

1 महिना 13 दिवसांत 4658 कोटी रुपये जप्त

 

Election Commission : लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई निवडणूक आयोगानं केलीय. 1 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत देशभरातून सुमारे 4658 कोटी रुपये निवडणूक आयोगाने जप्त केलेत. यात रोख रक्कम, सोनं-चांदी, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आयोगाने 3475 कोटी रुपये जप्त केले होते.. मात्र यंदा अवघ्या 1 महिना 13 दिवसातली जप्तीची रक्कम ही 2019 च्या पूर्ण निवडणुकीतील जप्तीच्या रक्कमेपेक्षा अधिक आहे..आयोगाच्या म्हणण्यानुसार या रकमेचा अंदाज काढला तर दररोज 100 कोटी रुपये जप्त केले जातायत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 10:28 वाजता

मिशन 45साठी भाजप आमदारांना टार्गेट-सूत्र

 

Loksabha Election 2024 : मिशन 45 साठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागलेत.. टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजप आमदारांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. महायुतीचा प्रत्येक खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येक आमदाराला विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य द्यावं लागणार आहे. तशा सूचनाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना दिल्यात. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ज्यांना पुन्हा आमदारकीचे तिकीट हवंय त्या सर्वांना आपल्या मतदारसंघातून लीड देणं बंधनकारक असणार आहे.. त्यामुळे एखाद्या उमेदवाराबाबत कितीही नाराजी असली तरी स्वतःला पुन्हा आमदारकीचं तिकीट मिळावे यासाठी तरी आमदारांना काम करावे लागणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 10:04 वाजता

मोदींची लाट आहे या भ्रमात राहू नका - नवनीत राणा

 

Navneet Rana : एकीकडे देशात मोदींच्या नावानं मतं मागितली जातायत, मोदी लाट असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते करतायत.. दुसरीकडे नवनीत राणांनी मात्र भलतंच विधान केलंय. मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका.. मोदी लाटेत मी अपक्ष म्हणून निवडून आले होते.. असं विधान नवनीत राणांनी केलंय. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 09:36 वाजता

VVPAT मतदान प्रक्रियेबद्दल आज महत्त्वाची सुनावणी

 

VVPAT : VVPAT मतदान प्रक्रियेबद्दल आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मतदानानंतर VVPAT पावती दाखवण्याच्या प्रक्रियेवर याचिकेतून संशय व्यक्त करण्यात आलाय. मतमोजणी VVPAT पावत्यांवरुन करण्याची मागणी करण्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 08:48 वाजता

माढा आणि सोलापूरचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज

 

Loksabha Election 2024 : माढा आणि सोलापुरातील उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत...शरद पवार गटात नुकताच प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील आज माढामधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत...तर त्यांच्याविरोधात उभे असलेले रणजितसिंह निंबाळकरही आजच अर्ज दाखल करणार आहेत...सोलापुरातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 Apr 2024, 08:44 वाजता

बारामतीत अजित पवार पर्यायी उमेदवार-सूत्र

 

Baramati Ajit Pawar : बारामतीत अजित पवार हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाल्यास खबरदारी म्हणून पर्यायी उमेदवार अजित पवार अर्ज भरणार आहेत...बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून विशेष खबरदारी घेतली जातेय...बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय...त्या येत्या 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...असं असताना उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावे देखील अर्ज नेण्यात आलाय...त्यामुळे बारामती मध्ये अजित पवार हे डमी उमेदवार असण्याची शक्यता आहे...बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक बनलीय...अशा परिस्थितीत उमेदवारीबाबत महायुतीकडून विशेष खबरदारी घेण्यात येतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -