Mumbai Sarvoday Bank : मुंबईतील सर्वोदय बँकेवर आरबीआयचे निर्बंध

Mumbai Sarvoday Bank : मुंबईतील सर्वोदय बँकेवर आरबीआयचे निर्बंध

18 Apr 2024, 00:04 वाजता

मुंबईतील सर्वोदय बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने निर्बंध

 

Mumbai Sarvoday Bank : मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटीव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केलेत...खातेधारकांना फक्त 10 ते 15 हजार रुपयेच काढता येणारेत...पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना संरक्षण देण्यात आलंय...ढासळलेल्या आर्थिक व्यवस्थेमुळे आरबीआयनं कठोर कारवाई केलीये...आज सायंकाळपासून हे निर्बंध लागू करण्यात आलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17 Apr 2024, 23:54 वाजता

दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं?.. अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

 

Ajit Pawar on Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? भूखंडाचे श्रीखंड खाल्लं आरोप कोणावर आहे? असा सवाल विचारत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.. या आरोपांमध्ये तथ्य नव्हतं मात्र आरोप झालेच ना. बदनामी झाली ना असं विधान अजित पवारांनी केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17 Apr 2024, 20:22 वाजता

पुण्यात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटसह पाऊस

 

Pune Rain : पुण्यात सलग तिस-या दिवशी पावसाला सुरूवात झालीये...वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय...तर वाघोली परिसरात गारांचा मारा झालाय... पुण्यात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरूवात झाली.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17 Apr 2024, 18:54 वाजता

नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदियात 19 एप्रिलला मतदान, प्रचार तोफा थंडावल्या

 

First Phase Election Campaign Over : आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या... नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा -गोंदियातील प्रचार आज संपला..  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय...तर देशात 21 राज्यात 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे...प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17 Apr 2024, 18:21 वाजता

जामनेरमध्ये सिलेंडरचा स्फोट, पात्र्याची 20 घरं जळून खाक

 

Jamner Cylinder Blast : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौकांबे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आगीचे तांडव.. या आगीत जवळपास झोपडी वजा पात्र्याची 20 घरं जळून खाक.. घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू तसेच येथील रहिवाशांची वाहनं देखील पूर्णपणे जळून खाक.. चार ते पाच बकऱ्यांचा देखील या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17 Apr 2024, 17:07 वाजता

हल्ल्यातून मनिषा राखुंडे-पाटील बचावल्या, वाहनांची तोडफोड करून हल्लेखोर फरार 

 

Dharashiv Attack : धाराशिवमध्ये मनिषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर हल्ला.. मनिषा राखुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकारी.. हल्ल्यातून मनीषा राखुंडे-पाटील बचावल्या..  वाहनांची तोडफोड करून हल्लेखोर फरार.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

17 Apr 2024, 14:12 वाजता

'रत्नागिरी -सिंधुदुर्गच्या उमेदवाराची उद्या घोषणा',दीपक केसरकरांची माहिती

 

Deepak Kesarkar : सिंधुदुर्गात नारायण राणे की किरण सामंत कोण महायुतीचा उमेदवार असणार अशी जोरदार चर्चा रंगत असतानाच सिंधुदुर्ग लोकसभेचा महायुतीच्या उमेदवाराचं नाव उद्या घोषित होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिली ...शिर्डीत केसरकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही तर सिंधुदुर्ग महायुतीच्या ज्या उमेदवाराचं नाव घोषित होईल तो परवा सकाळी अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मविआकडून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.   

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Apr 2024, 13:35 वाजता

'मुख्यमंत्री शिंदेंचं रामावरील प्रेम नकली',संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

 

Sanjay Raut on Eknath Shinde  : मुख्यमंत्री शिंदेंचं रामावरील प्रेम हे नकली आहे...राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय...राम लढणा-यांच्या पाठिशी उभा राहतो असाही टोला राऊतांनी लगावलाय...

17 Apr 2024, 13:11 वाजता

सत्यजित तांबेंचा विशाल पाटलांना पाठिंबा

 

Satyajeet Tambe on Vishal Patil : सांगलीतील विशाल पाटलांसाठी आमदार सत्यजित तांबे मैदानात उतरलेयत...विशाल पाटलांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळत नसल्याने सत्यजित तांबेंनी अजूनही वेळ गेलेली नाही...विशाल पाटलांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी असं म्हटलंय...विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे...त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. असं सत्यजित तांबेंनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Apr 2024, 12:35 वाजता

'लोकसभा निवडणुकीला बटण कचाकचा दाबा', अजित पवारांचं वादग्रस्त विधान 

 

Ajit Pawar : इंदापुरात अजित पवारांचं वादग्रस्त विधान केलंय..लोकसभा निवडणुकीला बटण कचाकचा दाबा....तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो...उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आमिष