Mumbai Sarvoday Bank : मुंबईतील सर्वोदय बँकेवर आरबीआयचे निर्बंध

Mumbai Sarvoday Bank : मुंबईतील सर्वोदय बँकेवर आरबीआयचे निर्बंध

17 Apr 2024, 12:11 वाजता

आमिर खान डीपफेकचा शिकार

 

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचंच प्रकरण ताजं असताना आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यानंही पोलिसांत धाव घेतलीये. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमिर डीपफेकचा शिकार झालाय.. यात एका राजकीय पक्षाचा खोटा प्रचार करणारं कॅप्शन वापरुन आमिरचा व्हिडीओ व्हायरल केलाय. व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की आमिरचा आवाज डब केलाय. याप्रकरणी आमिरने पोलिसांत धाव घेतली आहे.

17 Apr 2024, 11:26 वाजता

भंडाऱ्यात परिणय फुकेंच्या कारचा अपघात

 

Parinay Fuke Accident  : भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आमदार परिणय फुकेंच्या कारचा भीषण अपघात झालाय...मध्यरात्री 2 वाजताच्या साकोलीजवळ एक अज्ञात गाडी अचानक फुकेंच्या कारसमोर आली....मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळलीय...या अपघातात त्यांच्याच ताफ्यातील एक कार हायवेवरील दुभाजकावर आदळलीय..त्यात कारचं मोठं नुकसान झालंय...या अपघातातून डॉ.परिणय फुके थोडक्यात बचावलेत...दरम्यान हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त होतेय...काही दिवसापूर्वीच भंडा-यात नाना पटोलेंच्या कारचा अपघात झाला होता...त्यामुळे भंडा-यात नक्की चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Apr 2024, 11:13 वाजता

दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंच्या प्रचाराला काँग्रेसची पाठ

 

Anil Desai : दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंच्या प्रचाराला काँग्रेसने पाठ फिरवलीय...अनिल देसाई ठाकरे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आहेत...काँग्रेसला जागा मिळाली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे...दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड या आग्रही होत्या..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Apr 2024, 10:57 वाजता

अमरावतीत राणा दाम्पत्याने घेतली अभिजीत अडसुळांची भेट

 

Amravati Loksabha : अमरावतीत राणा दाम्पत्याने अडसूळ यांची भेट घेतलीय...गेल्या दहा वर्षांपासून राणा आणि अडसूळ हा वाद सुरू आहे...त्यातच आता राणा दाम्पत्याने अडसूळांची भेट घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय...यावेळी माजी आमदार अभिजीत अडसूळ आणि त्यांच्या पत्नी यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचे औक्षण करून स्वागत केलं...अडसूळही अमरावतीतून लढण्यासाठी इच्छुक होते...राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो असं अडसूळ यांनी म्हटलंय..त्यामुळे आता वाद मिटणार का...? अडसूळ राणांना निवडणुकीत मदत करणार का...? हे महत्त्वाचे आहे...

17 Apr 2024, 10:38 वाजता

मराठा आरक्षणावर टांगती तलवार

 

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर टांगती तलवार आहे...मुंबई हायकोर्टाने आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिलाय...मात्र, प्रवेश आणि नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय...याबाबतची पुढील सुनावणी ही 13 जूनला होणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Apr 2024, 09:40 वाजता

अबुधाबी, दुबई, UAEमध्ये पावसाचं थैमान

 

UAE Heavy Rainfall : मुसळधार पावसामुळे अबुधाबी, दुबई आणि UAEमध्ये पूर आलाय.. रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झालीये.. पुरामुळे या शहरांमधील कार्यालये आणि शाळा बंद करण्यात आलीत... तसंच लोकांना घरून काम करण्यास सांगण्यात आलंय.. सोमवारपासून UAE मध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. बहरीन, कतार आणि सौदी अरेबियामध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थितीही बिकट आहे. ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे 18 जणांचा मृत्यू झालाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Apr 2024, 09:19 वाजता

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

 

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.. चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन त्यांना धमकीचे फोन आलेत.. दाऊद आणि शोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये.. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.. 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Apr 2024, 08:39 वाजता

उत्तमराव जानकर शरद पवारांच्या भेटीला

 

 

Uttamrao Jankar : माढा लोकसभा मतदारसंघात नव्या घडामोडी...शरद पवार यांनी धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर याना भेटीला बोलवले...पुण्यात जानकर यांनी पवार यांच्या सोबत भेट होणार..सोबत माढा महा विकास आघाडी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील ही उपस्थित असणार...उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यास माढा.मध्ये भाजप मोठ्या संकटात

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Apr 2024, 08:19 वाजता

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

 

Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे...संध्याकाळी 5 वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत...महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार आहे...त्यामध्ये नागपूर, गडचिरोली, रामटेक, चंद्रपूर, भंडारा गोंदियातील प्रचार आज थांबणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Apr 2024, 07:59 वाजता

ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला-सूत्र

 

Thane Loksabha : ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता...प्रताप सरनाईक, रवींद्र फाटकांचं नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती...20 तारखेला उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता...'झी 24 तास'ला विश्वसनीय सूत्रांची माहिती...

बातमीचा व्हिडीओ पाहा-