रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक, विरोधकांवर जोरदार टीका करत म्हणाले 'मी या वृत्तीचा...'

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. 

Updated: Apr 26, 2024, 01:00 PM IST
रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक, विरोधकांवर जोरदार टीका करत म्हणाले 'मी या वृत्तीचा...' title=

Rohit RR Patil Facebook Page Hack : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. यावरुन काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी चाहत्यांना फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली आहे. 

रोहित पाटील यांचे ट्वीट

रोहित पाटील यांनी ट्विटरवर एक ट्वीट शेअर केले आहे. "माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले असून काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले जात आहेत. सदर अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून आपण सर्वांनी सदर ची पोस्ट रिपोर्ट करावे अशी विनंती आहे. निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षातील लोकांचे अकाउंट हॅक होताना सर्वत्र दिसत असून मी या वृत्तीचा निषेध करतो", असे रोहित पाटील यांनी म्हटले आहे. 

विरोधकांवर जोरदार टीका

रोहित पाटील यांनी सकाळी 10.30 च्या सुमारास हे ट्वीट केले आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षातील लोकांचे अकाउंट हॅक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  

कवठेमहांकाळ नगरपंचायतीत रोहित पाटलांची एकहाती सत्ता

दरम्यान रोहित पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील उर्फ आबा यांचा मुलगा आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित आर आर पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोहित पाटलांनी या नगरपंचायतीमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा 17 पैकी 10 जागांवर विजय झाला आहे. तर शेतकरी विकास आघाडी 6 आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती.