PHOTO: हसऱ्या चेहऱ्यामागे अनन्या काय लपवतेय? ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताच ती कॅमेरासमोर आली अन्...

Ananya Pandey Photos: अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्यामध्ये दुरावा? चर्चांनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली अनन्या... फोटो व्हायरल   

May 07, 2024, 12:29 PM IST

Ananya Pandey Photos: बॉलिवूड.. या झगमगणाऱ्या विश्वाकडे पाहताना अनेकांनाच या जगताचा हेवा वाटतो. अशा या कलाजगतामध्ये सध्या चर्चा सुरुये ती म्हणजे एका लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात आलेल्या दुराव्याची, त्यांच्या ब्रेकअपची. 

1/7

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर

Ananya Pandey spotted post breakup rumors with aditya roy kapoor photos viral

Ananya Pandey Photos: अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देणारी होती. पण, पाहता पाहता या जोडीला लोकप्रियता मिळाली आणि त्यांनीही हे नातं फारसं लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. 

2/7

रिलेशनशिप

Ananya Pandey spotted post breakup rumors with aditya roy kapoor photos viral

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता म्हणे, अनन्या आणि आदित्य या दोघांनीही दुरावा पत्करला आहे. त्यांचं ब्रेकअप झालं असून, सोशल मीडियावरील एक सूचक पोस्ट या चर्चांना आणखी वाव देऊन गेली. 

3/7

ब्रेकअपच्या चर्चा

Ananya Pandey spotted post breakup rumors with aditya roy kapoor photos viral

इथं ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतानाच तिथं या दोघांच्याही मित्रपरिवारातूनच एकानं त्यांच्या ब्रेकअपचं वृत्त जवळपास जाहीर केल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर पहिल्यांदाच अनन्या पांडे माध्यमांसमोर आली. 

4/7

पापाराझींना पाहताच...

Ananya Pandey spotted post breakup rumors with aditya roy kapoor photos viral

एरव्ही अनन्या जेव्हाजेव्हा पापाराझींसमोर आली आहे तेव्हातेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक कमालीची चमक आणि सुरेख हास्य पाहायला मिळालं आहे. पण, यावेळी मात्र अनन्याची झलक या साऱ्याला अपवाद ठरली.   

5/7

अनन्याचा लूक

Ananya Pandey spotted post breakup rumors with aditya roy kapoor photos viral

लूज डेनिम, निळसर रंगाच्या स्लीवलेस क्रॉप टॉपमध्ये अनन्या अतिशय कॅज्युअल लूकमध्ये यावेळी पाहायला मिळाली. तिचा हा लूक कॅज्युअल होताच, पण अनन्याच्या चेहऱ्यावरचे भीाव यावेळी बरंच काही सांगून गेले.   

6/7

कॅमेरासमोर येताच...

Ananya Pandey spotted post breakup rumors with aditya roy kapoor photos viral

कॅमेरासमोर येताच, किंबहुना पापाराझींना पाहताच अनन्यानं स्मितहास्य केलं, काही वेळा तिनं मनमोकळेपणानं उत्सुकता दाखवण्याचा प्रयत्नही केला पण तरीही नकळत काही गोष्टी लपून राहिल्या नाहीत. असं म्हणतात की तुमच्या मनातलं चेहऱ्यावर येतंच. तसंच काहीसं अनन्यासोबत झालं असावं असं फोटो पाहून नेटकरी म्हणत आहेत.   

7/7

आव्हानात्मक काळ?

Ananya Pandey spotted post breakup rumors with aditya roy kapoor photos viral

अनन्या सध्या भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक काळातून जात असल्यामुळं तिच्या या हास्यामागं नेमकं दडलंय काय याचा तर्क कोणालाही लावता आला नाही. अनन्यानं काही वेळासाठी माध्यमांसमोर पोझ दिल्यानंतर ती लगेचच तिथून निघून गेली आणि मागं सुरु झाल्या चर्चा... अनन्याच्या तुटलेल्या नात्याच्या...