सरकारी नोकरी सोडून 'हे' कलाकार बनले बॉलिवूड स्टार

अभिनय क्षेत्रात करिअर सुरु केल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीला कायमचा रामराम केला. 

| Apr 24, 2024, 16:53 PM IST

अभिनय क्षेत्रात करिअर सुरु केल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीला कायमचा रामराम केला. 

1/8

सरकारी नोकरीला 'या' कलाकारांनी केला रामराम

bollywood and south superstars who left government job to become actor know the list

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी सरकारी नोकरी करत होते. पण अभिनय क्षेत्रात करिअर सुरु केल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीला कायमचा रामराम केला.

2/8

बलराज साहनी

bollywood and south superstars who left government job to become actor know the list

बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणून बलराज साहनी यांना ओळखले जाते. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते सरकारी प्राध्यापक होते. 

3/8

अमरीश पुरी

bollywood and south superstars who left government job to become actor know the list

या यादीत अभिनेते अमरीश पुरी यांच्याही नावाचा समावेश होतो. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अमरीश पुरी यांनी विमा कंपनीत सरकारी लिपिक म्हणून काम पाहिले आहे.

4/8

जॉनी वॉकर

bollywood and south superstars who left government job to become actor know the list

सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी जॉनी वॉकर हे बस कंडक्टर म्हणून काम करत होते. भारताचे चार्ली चॅप्लिन अशी त्यांची खास ओळख होती. 

5/8

राज कुमार

bollywood and south superstars who left government job to become actor know the list

बॉलिवूड अभिनेते राज कुमार यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मुंबई पोलिसात काम केले आहे. ते सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. 

6/8

देव आनंद

bollywood and south superstars who left government job to become actor know the list

भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे देव आनंद. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी ते लष्करी सेन्सॉर ऑफिसमध्ये काम करत होते. 

7/8

शिवाजी साटम

bollywood and south superstars who left government job to become actor know the list

अभिनेते शिवाजी साटम हे ‘सीआयडी’ या कार्यक्रमात एसीपी प्रद्युम्न या पात्रामुळे घराघरात पोहोचले. त्यापूर्वी ते सरकारी बँकेत काम करायचे. 

8/8

रजनीकांत

bollywood and south superstars who left government job to become actor know the list

दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणारे सुपरस्टार म्हणून रजनीकांत हे कर्नाटकमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत होते.