महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांमध्ये आज मतदान; गडकरी, फडणवीस, प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Elections Voting : देशात लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर निवडणूक पार पडत आहेत. महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात आज मतदान पार पडणार आहे.

Apr 19, 2024, 11:55 AM IST
1/7

prafull patel

खासदार प्रफुल पटेल यांनी संपूर्ण कुटुंबासह मतदान केले. सशक्त लोकशाही निर्माण करण्यासाठी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन प्रफुल पटेल यांनी केले.

2/7

devendra fadnavis

नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि आईसह मतदानाचा हक्क बजावला. जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

3/7

vijay wadettiwar

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्नीसह ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

4/7

devraj holi

गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनीदेखील मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजावला.

5/7

ravindra singhal

नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी रविनगर परिसरातील सी. पी. अँड बेरार शाळेतील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

6/7

anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सपत्नीक त्यांचे मूळ गाव असलेल्या वडविहीरा येथे मतदानाचा हक्क बजावला.

7/7

mukul vasnik

काँग्रेस नेते मुकूल वासनिक यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.